कोरोनाग्रस्तांसाठी 'तेरणा' ची 'संजीवनी' ; बाधितांवर मोफत उपचार !

आतापर्यंत ८७ रूग्णांवर उपचार
 
कोरोनाग्रस्तांसाठी 'तेरणा' ची 'संजीवनी' ; बाधितांवर मोफत उपचार !
प्रशस्त इमारत; २४ ऑक्सीजन बेडची व्यवस्था

उस्मानाबाद - कोरोना महामारीने मोठा कहर माजविला आहे. जिल्हा रूग्णालयासह खासगी रूग्णालयातही बेडचा तुटवडा जाणवत आहे. त्यातच अतिगंभीर रूग्णांना ऑक्सिजनची मोठी गरज भासत असताना ऑक्सिजन बेडअभावी अनेकांना जीव गमवावा लागत आहे. मात्र कोरोना महाबिमारीच्या संकटात तेरणा कोविड केअर सेंटर रूग्णांसाठी जणू 'संजीवनी'च ठरत आहे. कोरोनाग्रस्त रूग्णांना याठिकाणी अगदी मोफत उपचार करण्यात येत आहेत. त्यासोबतच त्यांना डॉक्टरांसह कर्मचारीही आपुलकीची वागणूक देत असून सोयी-सुविधाही पुरविल्या जात आहेत. २४ ऑक्सीजन बेडची याठिकाणी व्यवस्था आहे. आतापर्यंत ८७ रूग्णांवर यशस्वीपणे उपचार करण्यात आले असून ६५ रूग्ण ठणठणीत बरे झाले आहेत.

जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची दिवसेंदिवस संख्या वाढत चालली आहे. आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे. रूग्णांसह नातेवाईकांना ऑक्सीजन बेडच्या शोधात धावपळ करावी लागत आहे. जिल्हा रूग्णालयात खचाखच रूग्ण संख्या असल्याने एक तर डिस्चार्ज झाल्यावर नसता मृत्यू झाल्यावरच बेड शिल्लक होत असल्याचे चित्र आहे. ऑक्सीजन बेड मिळविण्यासाठी मोठे 'अग्निदिव्य' पार करावे लागत आहे. त्यातच खासगी रूग्णालयात उपचारासाठी नातेवाईकांना मोठा खर्च करावा लागतो. सध्यस्थितीत कोरोनाने विचित्र परिस्थिती ओढावली असून रूग्णांसह नातेवाईकही चिंताग्रस्त झाले आहेत. मात्र अशा गंभीर परिस्थितीत माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील व आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी कोरोनाग्रस्तांचा 'आधार' देण्याचे 'पुण्य' कार्य सुरू केले आहे. 

कोरोनाग्रस्तांवर मोफत उपचार होवून त्यांना दिलासा मिळावा, यासाठी माजी मंत्री डॉ. पाटील, आ. पाटील यांनी तेरणा पब्लिक चारिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व तेरणा जनसेवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने 'डेडीकेटेड कोविड-१९ केअर सेंटर' उस्मानाबाद शहरातील संजीवन हॉस्पिटलमध्ये सुरू केले आहे. २४ एप्रिल रोजी हे सेंटर सुरू करण्यात आले असून याठिकाणी २४ ऑक्सिजन तर २ नॉर्मल बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांना डॉक्टरांसह कर्मचारीही आपुलकीची वागणूक देत असून त्यांना धीर देण्यासोबतच उत्कृष्ट आरोग्य सुविधा पुरवित आहेत. आतापर्यंत ८७ रूग्णांवर उपचार करण्यात आले असून तब्बल ६५ जण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

कोविड सेंटरमध्ये एसपीओ २ कमी असणाऱ्या रूग्णांना ऑक्सीजन पुरवठा केला जात आहे. याशिवाय रूग्णांना गरजेनुसार रेमडेसिविर व टॉक्सीझुमाब मिळवून देण्यासाठी सेंटर मदत करत आहे. रूग्णांना दोन वेळा जेवण, दोन वेळा नाष्टा दिला जात आहे. तसेच अतिगंभीर रूग्णांना जिल्हा शासकीय रूग्णालयात नेण्यासाठीही सुसज्ज रूग्णवाहिका दिमतीला ठेवण्यात आली आहे. विशेषत: ही रूग्णवाहिकेत ऑक्सीजनचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे. आरोग्य सुविधेसह रूग्णांना डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांकडून आपुलकीची वागणूक मिळत असल्याने रूग्णांसह नातेवाईकांमधून समाधान व्यक्त होत आहे. कोरोनाग्रस्त आलेले रूग्ण उपचारानंतर ठणठणीत होवून बरे होते असल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे कोरोनाच्या अतिगंभीर संकटात 'तेरणा'ची रूग्णांना 'संजीवनी' मिळत असल्याचे म्हटले जात आहे.

तज्ञ डॉक्टरांची टिम
कोविड सेंटरमध्ये तेरणा सुपरस्पेशालिटी तर्फे हृदयरोग, श्वसनविकार रोग, बालरोग, स्त्रीरोग, अस्थिरोग डॉक्टरांची टिम सज्ज आहे. यामध्ये डॉ. अनिष मायनी, डॉ. सागर पाटील, डॉ. दिपक बाराते, डॉ. कृष्णा लाखे, डॉ. स्वप्नील पाचपांडे, डॉ. आकाश पाठक, डॉ. परवीन सय्यद यांचा समावेश आहे. तसेच आयएमआय व जिल्हा रूग्णालय यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सचिन देशमुख, डॉ. धनंजय देशमुख, डॉ. स्वप्नील यादव यांचा समावेश आहे. तर रूग्णांसाठी तेरणा ट्रस्टचे व्यवस्थापकीय समन्वयक गणेश भातलवंडे, प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. माने यांचे मोठे सहकार्य लाभत आहे.

नर्सिंग टिमची कौतुकास्पद कार्य
याठिकाणी येणाऱ्या रूग्णांसह नातेवाईकांना नर्सिंग स्टाफकडून आपुलकीची वागणूक मिळत आहे. रूग्णांच्या सेवेत अनुजा माळी, सुमीत धावारे, हॉस्पिटल व्यवस्थापक मुस्ताक शेख, जितेंद्र सांजेकर, सुरज मसे, राजेश पडवळ, प्रिती कांबळे, निकीता कसबे, लता चांदणे, वसीम पठाण, उमर शेख, अनुसया माळी, प्रतिक्षा भोसले, अक्षता गायकवाड, निशा शिंदे, मिनाक्षी गरड यांचे सहकार्य लाभत आहे.

From around the web