जाणून घ्या क्‍वारंटाइन हा शब्द कोठून आला...

 
तो शब्द पहिल्यांदा कधी वापण्यात आला ?

  जाणून घ्या क्‍वारंटाइन हा शब्द कोठून आला...

जगात कोरोना विषाणू वेगाने पसरत  आहे त्यादरम्यान  एक शब्द प्रत्याकाच्या तोंडात सतत येताना दिसतोय तो  शब्‍द  म्हणजे  क्‍वारंटाइन ( quarantine) . हल्ली प्रत्येक जण या शब्दाचा वापर करीत आहे. जरी आजही काही लोकांना त्याचा अर्थ माहित नसला तरी लोक शब्द आवर्जून वापरतायत त्यामुळे  हा शब्द आजच्या काळातील सर्वात लोकप्रिय शब्दांपैकी एक बनला आहे.   हा शब्द जगातील कोट्यावधी लोकांना नवीन आहे. पण मित्रांनो आपण हा शब्द कोठून आला आणि कधी वापरला याचा विचार केला आहेत काआमच्याकडे याचे उत्तर आहे. त्यापूर्वी  क्‍वारंटाइन ( quarantine) चा अर्थ आपण समजावून घेऊया.

 ज्यांना रोगाचा धोका आहे अशा लोकांना पूर्णपणे अलग,वेगळे ठेवणे हे एकप्रकारचे बंधन असते यालाच    क्‍वारंटाइन  म्हणतात. अशा परिस्थितीत लोक एका ठिकाणी बंदिस्त असतात आणि यावेळी त्यांना कोणालाही भेटण्याची , बोलण्याची किंवा त्यांनी घरा बाहेर पडण्याची परवानगी नसते. संसर्गजन्य रोग असलेल्या व त्यालंबंधित आजारांमुळे पीडित असणाऱ्या रूग्णांवर  क्‍वारंटाइन   प्रकारचा निर्बंध अनेकदा घातला जातो. याचा अर्थ असा होतो की एका व्यक्तीपासून दुसर्‍या व्यक्तीला संसर्ग होऊ नये म्हणून आजारी व्यक्तीला   क्‍वारंटाइन  केले जाते. त्याला वैद्यकीय संज्ञेत   मेडिकल आइसोलेशन  किंवा कॉर्डन सॅनिटायझर असे देखील म्हणतात.

कॉर्डन सॅनिटायझर म्हणजे लोकांना विशिष्ट जागेत, आखून दिलेल्या सीमेतच राहण्याची परवानगी असणे ज्यातून ते बाहेर पडू शकत नाहीत. जर अशा लोकांना सामान्य लोकांप्रमाणेच सोडले गेले तर ते हा रोग इतर हजारो लोकांमध्ये पसरवू शकतात. संसर्गजन्य रोग पसरू नयेत यासाठी सावधानतेचा उपाय म्हणून आजारी रूग्णांवर ही बंदी घातली जाते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे की हे मानवांव्यतिरिक्त इतर प्राण्यांनाही लागू होते.

क्‍वारंटाइन शब्‍दाचे मूळ

क्‍वारंटाइन  हा शब्द प्रत्यक्षात क्वारंटेनामधून आला आहे जो व्हिएतनामी शब्द आहे. याचा अर्थ 40 दिवस.  1348-1359  दरम्यान युरोपमधील तीस टक्के लोक प्लेगमुळे मरण पावले.
1377 साली क्रॉ एशिया ( city-state of Ragus) राज्याने आजारी लोकांना वेगळ्या ठिकाणी 30 दिवसांसाठी बेटावरील जहाजांवर ठेवण्याचा आदेश दिला होता.   यावेळी हे नोंदवले गेले की एखाद्या व्यक्तीला प्लगची लक्षणे नसतात. 1448 मध्ये या अलग ठेवण्याची वेळ 40 दिवसांपर्यंत वाढविण्यात आली. जोपर्यंत तीस दिवस होता त्याला ट्रॅन्टाईन असे म्हटले गेलेजेव्हा तो चाळीस दिवसांचा होतातेव्हा त्याला क्वारंटाईन असे म्हणतात. या शब्दाचा उगमही येथून झाला आहे. 40 दिवसांच्या अलग ठेवण्याचा परिणाम त्यावेळी स्पष्टपणे दिसून आला आणि प्लेग बर्‍याच अंशी नियंत्रित झाला. त्यावेळीप्लेगच्या पेशंटचा जवळजवळ 37 दिवसात मृत्यू झाला.
   

7 व्या शतकात लिहिलेल्या पुस्तकातही  क्वारंटाइन शब्दाचा  उल्लेख

सातव्या शतकात लिहिलेल्या पुस्तकातदेखील क्वारंटाईन शब्दाचा उल्लेख आढळतो जे पुस्तक  लेविटिकसने ( Biblical book of Leviticus)  लिहिले होते. यामध्ये संसर्ग झालेल्या आजारी व्यक्तीला इतरांपासून विभक्त करण्याचा उल्लेख आहे. जेव्हा शरिरावर पांढरा डाग उठतो तेव्हा आजारी व्यक्तीला सात दिवस वेगळे केले होते. जर सात दिवसांनंतर  रुग्णामध्ये कोणताही फायदा बदल झाला नसेल तर पुन्हा सात दिवस बाजूला ठेवले जायचे आणि नंतर पुन्हा तपासणी केली जायची याचाही त्यात उल्लेख आहे.

From around the web