वाशी : लॉकडाऊन काळातही पोलिसांची लाचखोरी : पोलीस उपनिरीक्षकांसह चौघावर गुन्हा दाखल

 
वाशी : लॉकडाऊन काळातही पोलिसांची लाचखोरी : पोलीस उपनिरीक्षकांसह चौघावर गुन्हा दाखल

उस्मानाबाद - लॉकडाऊनच्या काळातही पोलिसांची  लाचखोरी सुरूच आहे. ५० हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी  वाशी पोलीस स्टेशनच्या एक  पोलीस उप निरीक्षक, एक पोलीस कॉन्स्टेबल, एक पोलीस वाहन चालक आणि एक खासगी इसम अश्या चौघावर  वाशी पोलीस स्टेशनमध्येच रविवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मुरुमने  भरलेला एक ट्रॅक्टर सोडण्यासाठी  पोलीस उपनिरीक्षक आणि एक पोलीस कॉन्स्टेबलने मिळून ५० हजार रुपये लाच मागितली होती.   तडजोडी अंती ४५ हजार रूपये मागणी करुन पहिला हफ्ता ३० हजार रुपये स्विकारल्यानंतर पोलीस उप निरीक्षकासह पोलिस कर्मचारी आणि  शासकीय वाहनचालक शासकीय वाहनाने  पसार झाले. 

कोण आहेत हे लाचखोर ? 

एसीबीच्या . उस्मानाबाद पोलिस उपअधीक्षक कार्यालयाच्या पथकाने ही कारवाई केली आहे.वाशी पोलीस  स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक योगेश खटाने,पोलिस नाईक सम्राट माने,  खासगी इसम बाळासाहेब बिभीषण हाके व अनोळखी वाहन चालक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार यांना ट्रॅकटरमधे मुरुमची वाहतूक करत असताना पोलिसांनी पकडले. दरम्यान तक्रारदार यांच्यावर कारवाई न करण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी ५० हजार रूपयाची मागणी केली. तडजोडी अंती ४५ हजार रूपये मागणी करुन पहिला हफ्ता ३० हजार रुपये स्विकारल्यानंतर पीएसआयसह पोलिस कर्मचारी अन शासकीय वाहनचालक पसार झाले.सरमकुंडी येथे एसीबी पथकाने सापळा रचला होता.

दरम्यान सापळा अधिकाऱ्यांनी थांबविण्याचा प्रयत्न केला असता, लाच स्विकारणारे पळून गेले. दरम्यान तपास अधिकाऱ्यांना दुखापत  झाली. लाच स्विकारणारे पीएसआय, एक पोलिस कर्मचारी, शासकीय वाहन चालक हे शासकीय वाहनासह पसार झाल्याचे शेवटी समोर आले. अशी माहिती सापळा अधिकारी पोलिस निरिक्षक जी. एस. पाबळे यांनी दिली आहे.

वाशी : लॉकडाऊन काळातही पोलिसांची लाचखोरी : पोलीस उपनिरीक्षकांसह चौघावर गुन्हा दाखल

From around the web