दणका : उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या आकाशवाणीसमोरील भूखंडाची चौकशी सुरु

 
दणका : उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या आकाशवाणीसमोरील भूखंडाची चौकशी सुरु


उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्हा  मराठी संघाने शासनास खोटी माहिती देऊन  विस्तारीत  पत्रकार भवनसाठी आकाशवाणी समोर ( शासकीय स्त्री रुग्णालय जवळ ) मिळवलेला शासकीय भूखंड परत घेण्यात यावा, अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी, जिल्हाधिकाऱ्याकडे एका निवेदनाद्वारे केली होती, त्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर निवासी उपजिल्हाधिकारी शिरीष यादव यांनी, उपविभागीय अधिकाऱ्यास  पत्र लिहून, तक्रारदाराने अर्जात लिहिलेल्या नमूद मुद्यांच्या अनुषंगाने कागदपत्रांची तपासणी करून, चौकशी करावी आणि नियमानुसार कार्यवाही करावी तसेच सदर  प्रकरणात जमिनीचा शिस्तभंग झालेला आहे किंवा  कसे याबाबतचा प्रस्ताव स्वयंस्पष्ट अभिप्रायासह  अहवाल तात्काळ सादर करावा असे लिहिले आहे.

या चौकशीमुळे  उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या भ्रष्ट पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. 

काय आहे प्रकरण ? 

उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार  संघास  आंबडेकर पुतळ्याजवळ शासनाने सन  १९९८- ८९ मध्ये भूखंड दिलेला आहे आणि त्यावर  १९९१ मध्ये  इमारत उभी करण्यात आलेली आहे. त्यानंतर १९९७ मध्ये पत्रकार संघाच्या  वाढीव  बांधकामास शासनास निधी मागण्यात आला आणि शासनाकडून आलेल्या दोन लाख निधीतून सांजा रोडवर  २० गुंठे  भूखंड खरेदी करण्यात आला आहे.

आंबडेकर पुळ्याजवळ  इमारत असताना, सांजा रोडवर २० गुंठे भूखंड असताना २००९ मध्ये  शासनास खोटी माहिती देऊन  विस्तारीत  पत्रकार भवनसाठी आकाशवाणी समोर ( शासकीय स्त्री रुग्णालय जवळ )  ६ गुंठे शासकीय भूखंड लाटण्यात  आलेला  आहे. हा भूखंड देताना, त्यात स्पष्ट नमूद केलेले आहे की , तीन वर्षाच्या आत प्रतिग्रहीता जमिनीवर भरीव आणि कायम स्वरूपाची इमारत उभी करावी, यात कसूर केल्यास जमीन शासनास परत घेण्याची कार्यवाही करण्यात येईल.

उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघास आकाशवाणी समोर ( शासकीय स्त्री रुग्णालय जवळ ) सहा गुंठे शासकीय भूखंड देऊन आजमितीस ११ वर्षे पूर्ण झाले असून, त्या जागेवर अद्याप इमारत  बांधण्यात आलेली नाही. हा शासनाने दिलेल्या नियम आणि अटीचा भंग असून, जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ आकाशवाणी समोर ( शासकीय स्त्री रुग्णालय जवळ ) सहा गुंठे शासकीय भूखंड परत घ्यावा आणि तो शासकीय स्त्री रुग्णालयाच्या विस्तारित बांधकामास द्यावा, अशी मागणी सुभेदार यांनी केली होती.

दणका : उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या आकाशवाणीसमोरील भूखंडाची चौकशी सुरु
दणका : उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या आकाशवाणीसमोरील भूखंडाची चौकशी सुरु

From around the web