उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाचा चार कोटींचा भूखंड विकण्याचा घाट
Thu, 13 Aug 2020
विद्यमान पदाधिकाऱ्यांचे मनसुभे , पत्रकार संघाचे अन्य सदस्य अंधारात
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाचा सांजा रोड वरील अर्धा एकर भूखंड विकण्याच्या हालचाली सुरु असून, त्याला जिल्हाभरातील पत्रकारांनी विरोध दर्शविला आहे. हा भूखंड विकण्यास तत्कालीन जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांनी स्थगिती दिली असताना, विद्यमान पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांना अंधारात ठेवून, पुन्हा भूखंड विकण्याचा घाट घातला आहे.
उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाची आंबेडकर पुतळ्याजवळ इमारत आहे. ही इमारत १९९१ मध्ये भारत गजेंद्रगडकर अध्यक्ष असताना बांधण्यात आली होती. त्यानंतर १९९५ मध्ये राजेंद्र बहिरे अध्यक्ष असताना ही इमारत छोटी असल्याचे कारण सांगत असताना, वाढीव बांधकाम करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याकडे निधी मागितला. त्यानंतर जोशी यांनी १० लाख मंजूर करून २ लाख पाठवले होते.
त्या रक्कमेतून राजेंद्र बहिरे यांनी, पत्रकार संघाच्या नावाने सांजा रोडवर सर्वे नंबर २४९, २५० मध्ये अर्धा एकर भूखंड खरेदी केला होता. हा भूखंड शासनाच्या पैश्यातून खरेदी करण्यात आल्याने त्यावर शासनाची मालकी आहे. असे असताना, चार कोटी रुपयाचा हा भूखंड एका खासगी इसमास ९५ लाख रुपयात विकल्याचे दाखवून, अन्य रक्कम खिशात घालण्याचा डाव सुरु आहे.
काही वर्षांपूर्वी हा भूखंड विकण्याचा असाच प्रयत्न सुरु होता, तेव्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष भारत गजेंद्रगडकर आणि राजेंद्र बहिरे यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांच्याकडे लेखी तक्रार केली असता, गेडाम यांनी, हा भूखंड विकण्यास स्थगिती दिली होती.
ही स्थगिती उठली नसताना, पत्रकार संघाच्या अन्य सदस्य आणि ज्येष्ठ पत्रकारांना अंधारात ठेवून हा भूखंड विकण्याच्या हालचाली सुरु आहेत. एका खासगी इसमास हा भूखंड दाखवण्यात आला आहे. ९५ लाख रुपयात विक्री दाखवण्यात येत आहे. चार कोटी रुपयाचा हा भूखंड कमी पैश्यात विकल्याचे दाखवून खिसे भरण्याचे स्वप्न रंगवले जात आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील पत्रकारांनी जागृत होऊन, त्याला कडाडून विरोध करावा, तसेच हा भूखंड विकल्यास विद्यमान पदाधिकाऱ्यावर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करावे असे आवाहन पत्रकार सुनील ढेपे यांनी केले आहे. .