कोरोना मुक्त उस्मानाबाद जिल्हा- उस्मानाबाद पोलीस दलाचा निर्धार...

 
कोरोना मुक्त उस्मानाबाद जिल्हा- उस्मानाबाद पोलीस दलाचा निर्धार...

संसर्गजन्य आजार कोरोना (कोविड- 19) च्या साथीला प्रतिबंध व्हावा या उद्देशाने शासनाच्या विविध विभागां मार्फत उपाय योजना केल्या जात आहेत. त्यास अनुसरुन पोलीस अधीक्षक  राज तिलक रौशन यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद जिल्ह्यात लॉकडाउन- संचारबंदीची यशस्वी अंमलबजावणी व्हावी, परजिल्हा- परराज्यातून स्थलांतरीत, प्रवासी उस्मानाबाद जिल्ह्यात येउ नये. या उद्देशाने उस्मानाबाद जिल्हा सिमेवरील प्रमुख रस्त्यांवर 4 आंतरराज्य चेक पोस्टसह इतर 26 अशा एकुण 30 ठिकाणी चेक पोस्ट उभारण्यात आले आहेत. या चेक पोस्टवर 2 पाळ्यांत 300 पोलीस अधिकारी- कर्मचारी अहोरात्र सतर्क हजर आहेत. पर जिल्ह्यातून उस्मानाबाद जिल्ह्यात खोटी कारणे सांगूण, विनाकारण व विनापरवाना घुसू पाहणाऱ्या व्यक्तीं- वाहनांना प्रतिबंध केला जात आहे. या कामी पोलीस दलाच्या मदतीस गृह रक्षक दलाच्या 282 स्त्री- पुरुष जवानांची मदत घेतली जात आहे. आडवाटेने होणारी घुसखोरी टाळण्यासाठी जिल्हाभरात 25 पोलीस वाहनांद्वारे अहोरात्र गस्त घातली जात असुन 2 ड्रोन विमानांद्वारे संचारबंदीवर देखरेख केली जात आहे.

नागरीकांनी मॉर्निंग वॉक, इव्हीनिंग वॉक, खेळणे इत्यादी कारणांकरीता घरा बाहेर पडू नये म्हणुन भल्या पहाटे पासूनच पोलीस ठाण्यातील पेट्रोलींग वाहनावरील ध्वनी क्षेपकाद्वारे जनतेस आवाहन केले जात आहे. विनाकारण फिरणाऱ्यांची वाहने जप्त करणे, मास्क न बांधणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, संचारबंदी आदेशाचे उल्लंघन, किराणा (भुसार) दुकाना समोर दर पत्रक न लावणे, सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तींत सुरक्षीत अंतर (सोशल डिस्टन्सींग) न राखणे, विनापरवाना घुसखोरी करणे, अशा प्रकरणांत गुन्हे नोंदवण्यात येत असुन दंडात्मक कारवाई केली जात आहे. बँका, जिल्हा सामान्य रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी सोशल डिस्टन्सींग चे पालन होण्या करीता पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ग्रामस्तरावर या कामी पोलीस पाटील, ग्रामसुरक्षा दल, युवक मंडळे, पोलीस मित्र यांचे सहकार्य पोलीस दला मार्फत घेतले जात आहे.

क्वारंटाईन व्यक्ती व संशयीत रुग्णांचा व त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शोध घेतला जात असुन त्यांनी क्वारंटाईन ईमारत सोडून इतरत्र फिरु नये याकरीता पोलीस बंदोबस्त नेमन्यात आला आहे. कोरोना रुग्ण आढळलेल्या बलसूर, धानूरी, उमरगा या गावांच्या सिमा सिलबंद करुन त्यावर चोख बंदोबस्त ठेवण्यात येत आहे.

गरीब वर्गाची अन्नधान्य- सामान याविना आबाळ होउ नये म्हणून दानशूर व्यक्ती- संस्था यांच्या सहकार्याने पोलीस ठाणी स्तरावर शेकडो फूड पॅकेट्सचे वाटप करण्यात आले आहे. रस्त्यावरुन पायी जाणाऱ्या स्थलांतरीतांना रोखून त्यांची रवानगी जिल्ह्यातील 17 निवारा गृहात करण्यात येत आहे. त्या ठिकाणी पोलीसांचा खडा पहारा देण्यात येत आहे. स्थलांतरीतांना आवाहन करण्यासाठी ध्वनीक्षेपक यंत्रांचा वापर करण्यात येत आहे. निवारा गृहातील स्थलांतरीतांचे मनोबल खच्ची होउ नये म्हणून त्यांचे प्रबोधन पोलीस दला मार्फत करण्यात येत आहे.

कोरोना मुक्त उस्मानाबाद जिल्हा- उस्मानाबाद पोलीस दलाचा निर्धार...
या सर्व बंदोबस्तावर देखरेख ठेवण्यासाठी पोलीस मुख्यालयातील आय.टी. सेल विभागात ‘कोविड सेल’ ची स्थापना करण्यात आली आहे. पोलीस नियंत्रण कक्ष व 18 पोलीस ठाणी यांना स्वतंत्र दुरध्वनी क्रमांक देउन कोविड हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे.  पोलीस जवानांना कोरोना संसर्ग होउ नये म्हणून उच्च दर्जाचे मास्क व चेहरा झाकण्यासाठी (फेस शिल्ड), सॅनिटायझर पुरवण्यात आले आहेत.
या  बंदोबस्त, चेक पोस्टची नित्याने पाहणी करण्या करीता स्वत:  पोलीस अधीक्षक . राज तिलक रौशन व अपर पोलीस अधीक्षक  संदीप पालवे हे जिल्हा भरात गस्त घालून, अचानक भेट देउन बंदोबस्ताचे मनोबल वाढवत आहेत.

From around the web