पाडोळी : सोयाबीनच्या शेंगाला कोंब फुटले, शेतकरी हवालदिल

 
 पाडोळी : सोयाबीनच्या शेंगाला  कोंब फुटले,  शेतकरी  हवालदिल

पाडोळी (प्रशांत सोनटक्के) -  कधी कोरडा तर कधी ओला दुःष्काळ पाचवीला पुजलेल्या शेतकऱ्यावर यंदा पुन्हा संकट कोसळले आहे. हातातोंडाशी आलेल्या सोयाबीनच्या शेंगाला कोंब फुटले असून, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. 

उस्मानाबाद तालुक्यातील पाडोळी(आ) आणि परीसरातील  दहा बारा गावामध्ये मागील चार पाच दिवसांपासून सुरू असलेल्या बुरबुर पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

या वर्षी या परिसरात पिक वाढी पुरताच मर्यादित पावस पडत गेल्यामुळे सोयाबीन, उडीद, मूग, तूर आदी पीक जोमात आली पण; विहिरी आणि बोरचं कसलेच पाणी वाढले नसल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे दुसऱ्या बाजूने आता सोयाबीन काढणीच्या पुढेच पाऊस लागून राहिल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे उभे सोयाबीन जागेवरच उगवत आहे. मोठ्या प्रमाणात हिरव्या शेंगाना सुद्धा पालवी फुटत, काही ठिकाणी जागेवरच शेंगा कुजत आहेत. 

 पाडोळी : सोयाबीनच्या शेंगाला  कोंब फुटले,  शेतकरी  हवालदिल


विहिरी बोरचं पाणी न वाढल्यामुळे आणि हातातोंडाशी आलेले सोयाबीनचे नुकसान होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त अवस्थेत असून शासनाने तात्काळ सोयाबीन पिकांचे आणि वादळी वाऱ्यामुळे अनेकांचे भुईसपाट झालेल्या ऊसाचे पंचनामे करावेत,  अशी शेतकरी वर्गातून मागणी होत आहे.

From around the web