ऑफलाइन विमा स्विकारण्यासह पीक विमा भरण्यास मुदतवाढ द्यावी -आ.राणा जगजितसिंह पाटील
Mon, 27 Jul 2020
उस्मानाबाद - ऑनलाइन ७अ/ १२ब, ८अ उतारे दिसून येत नसल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकरी पीक विमा भरण्या पासून वंचित आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील जवळपास १५५ गावांमधून ८५० शेतकर्यांनी त्यांचे ७अ/ १२ब, ८अ उतारे ऑनलाइन दिसत नसल्याच्या तक्रारी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांच्याकडे केल्या आहेत. तर अशाच अडचणीत असलेल्या अनेक शेतकर्यांनी तक्रारी केलेल्या नाहीत. या अगोदर काही गावे ऑनलाइन दिसत नसल्यामुळे व कोरोंना संकटातील आर्थिक अडचणीमुळे शेतकर्यांना पीक विमा भरण्यास विलंब झाला आहे. राज्यातील इतर काही जिल्ह्यामध्ये देखील हीच परिस्थिती आहे. त्यामुळे ऑफलाइन विमा स्विकारण्यासह पीक विमा भरण्यास १५ दिवसाच्या मुदतवाढ देद्णेबाबत केंद्र सरकारला विनंती करावी तसेच तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे ऑफलाइन पीक विमा हप्ता स्वीकारण्यास विमा कंपन्यांना आदेशीत करावे अशी मागणी आ.राणा जगजितसिंह पाटील यांनी कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे केली आहे.
ऑनलाइन ७अ/१२ब, ८अ उतारे न दिसणे व इतर कारणांमुळे आजही जिल्ह्यातील अनेक शेतकरी पीक विमा भरणे बाकी आहेत. ७अ/१२ब, ८अ चा विषय एक दोन दिवसात मार्गी लागला तरी देखील शेवटी होणार्या गर्दीमुळे सर्व्हर वर लोड आल्याने सर्व्हर डाऊन होण्याचा संभव आहे.त्यामुळे या सर्व अडचणींचा विचार करून राज्यातील एकही शेतकरी पीक विमा भरण्यापासून वंचित राहू नये, यासाठी पीक विमा हप्ता भरण्यास १५ दिवसांची मुदतवाढ देणेबाबत केंद्र सरकारला विनंती करावी, तसेच महसूल यंत्रने कडून महिती मागवून, ज्या गावांमध्ये ऑनलाइन ७अ/१२ब, ८अ बाबत अडचणी आहेत, त्या गावातील शेतकर्यांचा जिल्हा मध्यवर्ती बँकेत ऑफलाइन पीक विमा हप्ता स्वीकारण्यास संबंधित विमा कंपनीला आदेशीत करावे, अशी मागणी आ.राणा जगजितसिंह पाटील यांनी कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे केली आहे.