मुंबईहुन मस्सा खंडेश्वरी गावात आलेल्या व्यक्तीचा मृत्यू

 
कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह , मृत्यूचे गूढ कायम 

मुंबईहुन मस्सा खंडेश्वरी गावात आलेल्या व्यक्तीचा मृत्यू

उस्मानाबाद - मानखुर्द, मुंबई येथून  मस्सा खंडेश्वरी ( ता. कळंब ) येथे आलेल्या एका ४८ वर्षीय व्यक्तीचा आज उस्मानाबादेत मृत्यू झाला आहे. त्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला असून, त्यामुळे या व्यक्तीच्या मृत्यूचे गूढ कायम आहे.

मस्सा खंडेश्वरी ( ता. कळंब ) येथील एक ४८ वर्षीय व्यक्ती मानखुर्द, मुंबई येथून आल्यानंतर त्यास अस्वस्थ वाटू लागल्याने त्यास कळंब उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मंगळवारी रात्री त्यास कळंबहुन उस्मानाबाद येथे हलवण्यात आले होते, बुधवारी सकाळी त्याचा  मृत्यू झाला.

या व्यक्तीचा मृत्यू हा कोरोनामुळे झाल्याची अफवा उठली होती, पण या व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट हा निगेटिव्ह आला आहे. त्याचा  मृत्यू कश्यामुळे झाला हे शवविच्छेदन रिपोर्ट आल्यानंतर स्पष्ट होईल, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी सांगितले. 

From around the web