उस्मानाबादेतील कोरोना बाधित तरुणाचा मृत्यू

 
उस्मानाबादेतील कोरोना बाधित तरुणाचा  मृत्यूउस्मानाबाद - उस्मानाबाद शहरातील २५ वर्षीय कोरोना बाधित तरुणाचे आज निधन झाले, त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णाची संख्या आता चार झाली आहे.

उस्मानाबाद शहरातील धारासूर मर्दिनी देवी मंदिर परिसरात राहणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणास कोरोना झाला होता, तो गेल्या २६ दिवसापासून उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात ऍडमिट होता. त्यास ब्लड कॅन्सरचा दुर्धर आजार होता, त्यात कोरोना झाल्यामुळे या तरुणाची प्रकृती नाजूक बनली होती, अखेर त्याचे आज शनिवारी निधन झाले.

उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत  १४२ जणांना  कोरोना झाला आहे. पैकी चार जणांचा मृत्यू झाला आहे. १४२ पैकी १०५ बरे झाले असून, ३३ रुग्णावर सध्या उपचार सुरु आहेत. 

From around the web