कोरोनाग्रस्त आणखी एका रुग्णाचा मृत्यू @ १४
Jul 5, 2020, 14:03 IST
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात आज लागोपाठ दुसऱ्या दिवशी एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णाची संख्या आता १४ झाली आहे.
मुंबईहुन आलेला उमरगा येथील एक रुग्ण उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात ऍडमिट होता. त्याचा शनिवारी मृत्यू झाला. रविवारी आसू ता. परांडा येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.. लागोपाठ दुसऱ्या दिवशी कोरोनाने आणखी एक बळी घेतला.
38 वर्षीय पुरुष (रा. आसू ता. परांडा ) बार्शी मध्ये उपचार घेत होता, तिथेच पॉजिटीव्ह आला, दि. २८ जून रोजी परंड्याला ट्रान्सफर झाला व त्याच रात्री 9.55 वाजता सिविल हॉस्पिटल ला ट्रान्सफर झाला, BP चा त्रास होता, काल दुपार पासून व्हेंटिलेटर वर होता आज पहाटे चार वाजता मृत्यू पावला.
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने कहर माजवला असून, शनिवारी तब्बल तेरा रुग्णाची भर पडली आहे. , विशेष म्हणजे आणखी 17 पेंडिंग आहेत. त्याचा आज रिपोर्ट येणार आहेत.
यापूर्वीची सविस्तर बातमी वाचा
उस्मानाबाद जिल्ह्यात दिवसभरात तेरा रुग्णाची भर