उस्मानाबाद शहरातील दोन हॉस्पिटल २४ तासासाठी सील
Jun 12, 2020, 21:04 IST
उस्मानाबाद शहरातील आठ महिन्याची एक गर्भवती महिला कोरोना पॉझिटिव्ह निघाली असून, सदर महिला शहरातील चार रुग्णालयात उपचारासाठी गेल्याने खळबळ उडाली आहे. सध्या या महिलेवर लातूरच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
उस्मानाबादच्या बोंबले हनुमान चौक परिसरातील एका आठ महिन्याच्या गर्भवती महिलेस पायाला सूज आली होती. त्यानंतर सदर महिला तपासणीसाठी शहरातील चार हॉस्पिटलमध्ये गेली होती, परंतु तिच्यावर योग्य उपचार न झाल्याने लातूरला एका हॉपिस्टलमध्ये गेली होती, तिथे तिची कोरोना टेस्ट करण्यात आली असता, ती पॉजिटीव्ह निघाली आहे.
सदर महिलेचा पती येडशी येथील रहिवासी आहे. कोरोना पॉजिटीव्ह रिपोर्ट आल्यानंतर बोंबले हनुमान चौक परिसर तसेच येडशी येथील काही परिसर सील करण्यात आला आहे. तसेच उस्मानाबाद शहरातील सहयाद्री हॉस्पिटल आणि स्वामी हॉस्पिटल २४ तास सील करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
ही गर्भवती महिला डॉ. दापके यांच्या सह्याद्री हॉस्पिटल मध्ये काही दिवस ऍडमिट होती, त्यामुळे या हॉस्पिटल मधील २५ जणांचे स्वाब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
जिल्हयात रुग्णाची संख्या अशी
उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत सापडलेले कोरोना रुग्ण 142
एकूण बरे झालेले रुग्ण -90
उपचार घेत असलेले रुग्ण -49
एकूण मृत्यू पावलेले रुग्ण - 3
तालुकानिहाय रुग्ण
उस्मानाबाद - 59
कळंब- 36
उमरगा - 16
परंडा - 15
लोहारा -2
वाशी - 0
तुळजापूर -12
भूम -2
जिल्हयात रुग्णाची संख्या अशी
उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत सापडलेले कोरोना रुग्ण 142
एकूण बरे झालेले रुग्ण -90
उपचार घेत असलेले रुग्ण -49
एकूण मृत्यू पावलेले रुग्ण - 3
तालुकानिहाय रुग्ण
उस्मानाबाद - 59
कळंब- 36
उमरगा - 16
परंडा - 15
लोहारा -2
वाशी - 0
तुळजापूर -12
भूम -2