डॉ. गलांडे यांच्या कामावर आरोग्य मंत्री राजेश टोपे नाराज
Mon, 20 Jul 2020
कामात सुधारणा करण्याची दिली तंबी
जिल्हा शासकीय रुग्णालयात झालेल्या कोरोना रुग्णाच्या मृत्यू प्रकरणी अहवाल येताच कारवाई
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झालेला आहे. उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात परंडा तालुक्यातील एका कोरोना रुग्णाचा ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यू झाला होता. त्याची सध्या चौकशी सुरु आहे.
राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे हे रविवारी उस्मानाबाद दौऱ्यावर आले होते. त्यांच्या अध्यक्षेखाली उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात तीन तास आढावा बैठक झाली. यावेळी अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना, टोपे यांनी, बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती दिली. विशेष म्हणजे त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांच्या कामावर नाराजी व्यक्त करून कडक समज दिली असल्याचे सांगितले. तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयात परंडा तालुक्यातील एका रुग्णाच्या झालेल्या मृत्यूची चौकशी सुरु असून, अहवाल आल्यानंतर कडक कारवाई केली जाईल, असे संकेत दिले.
उस्मानाबाद येथे कोरोना टेस्ट लॅब (कोरोना चाचणी प्रयोगशाळा) दोन दिवसात सुरु होणार असून दररोज किमान तिनशे टेस्ट होणार असल्याचेही टोपे सांगितले
ऐका राजेश टोपे यांची संपूर्ण बाईट