कळंब :पाथर्डीच्या दाम्पत्याची कोरोनावर मात

 
कळंब :पाथर्डीच्या दाम्पत्याची कोरोनावर मात


कळंब - कळंब तालुक्यातील पाथर्डी येथील दाम्पत्याने कोरोनावर मात  केली आहे. त्यांच्यावर आज पुष्पवृष्टी करून रुग्णालयातून  डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी या दापंत्याचे डोळे पाणावले होते.मुंबईहून गावी आलेल्या  या दाम्पत्यावर गेल्या 10 दिवसापासून उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारानंतर त्यांचे पुन्हा स्वॅब पाठवण्यात आले होते. त्याचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
रूग्णांतील कर्मचाऱ्यांनी फुलांचा वर्षाव करत टाळ्यांचा कडकडाट गावाकडे जाण्यासाठी त्यांना निरोप दिला. यावेळी रूग्णांसह उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले होते. त्यांनी 10 दिवसांपासून उपचार करणाऱ्या आरोग्यदुतांचे आभार मानले. तसेच पाथर्डी ग्रामस्थांच्या वतीने सरपंच रंजना पिंगळे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ, तहसीलदार मंजुषा लटपटे, नायब तहसीलदार अस्लम जमादार, वैद्यकीय अधीक्षक डॉ.जिवन वायदंडे, गटविकास अधिकारी, नामदेव राजगुरू, पोलीस निरीक्षक तानाजी दराडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रदीपकुमार जाधव, डॉ.रामकृष्ण लोंढे, डॉ.सुधीर आवटे, डॉ.निलेश भालेराव,  पाथर्डी सरपंच रंजना पिंगळे, उपसरपंच अर्जुन जाधव, पोलीस पाटील बालाजी चिंचकर यांच्यासह रूग्णांलयातील ईश्वर भोसले यांच्या कर्मचारी, पोलीस कर्मचारी आदी उपस्थित होते.
कोरोना योद्धांबाबत कृतज्ञता व्यक्त
गोंधळी कलाकारांनी आपल्या गाण्यातून उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर कर्मचारी यांच्यासह कोरोना युध्दामध्ये सहभागी असणाऱ्या कोरोना योध्दे यांच्या प्रती आपल्या गाण्यातून कृतज्ञता व्यक्त केली.तसेच कोरोनाची परिस्थिती जिल्हा प्रशासन अतिशय योग्य हाताळत असल्याने त्यांचे आपल्या गितातुन कौतुक यावेळी केले.

उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत  कोरोना रुग्णाची संख्या २६ झाली आहे. पैकी सहा  जण बरे झाले असून, २० जणांवर उपचार सुरु आहेत.

From around the web