उस्मानाबाद : दिव्यांग व्यक्तीची समस्या ऐकण्यासाठी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर स्वतःची खुर्ची सोडून चक्क जमिनीवर बसले !

 
 उस्मानाबाद : दिव्यांग व्यक्तीची समस्या ऐकण्यासाठी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर स्वतःची खुर्ची सोडून चक्क जमिनीवर बसले !


उस्मानाबाद - उस्मानाबादचे नूतन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर  हे आपल्या केबिनमध्ये दिव्यांग व्यक्तीची समस्या ऐकण्यासाठी चक्क जमिनीवर बसल्याचा  फोटो व्हायरल झाला आहे. त्यामुळे नव्या कलेक्टर साहेबांबद्दल लोकांमध्ये  कुतूहल वाढले आहे. 


उस्मानाबादचे नूतन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर हे आपल्या कार्याचा ठसा उमटवण्यास सुरुवात केली आहे. रुग्णाची लूट करणाऱ्या सह्याद्री हॉस्पिटलला दहा हजार दंड केल्यामुळे  एक कतर्व्यदक्ष  जिल्हाधिकारी म्हणून त्याची छबी उमटली आहे.  त्यात  एका दिव्यांग दिव्यांग व्यक्तीची समस्या ऐकण्यासाठी जिल्हाधिकारी चक्क जमिनीवर बसल्याचा फोटो पाहून अनेकांना कौतूक वाटत आहे. 


घडले असे की , उस्मानाबाद  जिल्हाधिकारी कार्यालयात एक  दिव्यांग व्यक्ती आपल्या समस्या घेवून आला होता. त्यास खर्चीवर बसता येत नव्हते, ते पाहून जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर हे आपली खुर्ची सोडून त्याच्यासोबत जमिनीवर बसले आणि त्याची संपूर्ण  समस्या ऐकून  घेतली,  यावेळी त्या दिव्यांग व्यक्तीच्या आग्रहाखातर एक सेल्फी फोटोही  काढला.  या फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर याच्या माणुसकीबद्दल कौतूकाचा वर्षाव होत आहे. 


 उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात समस्या घेऊन आलेल्या व्यक्तीला खुर्चीवर बसता येत नाही म्हणून  स्वतःची ख्रुर्ची सोडून जमिनीवर बसणारे कौस्तुभ दिवेगावकर उस्मानाबादचे पहिले जिल्हाधिकारी आहेत, हे येथे  उल्लेखनीय. 


हेही वाचा 

जिल्ह्याधिकाऱ्यांच्या एका कृतीमुळे त्या दिव्यांग व्यक्तीच्या अंगात हत्तीचे बळ !

नेमके काय घडले ? 

उस्मानाबाद नगर पालिकेच्या प्रवेशद्वारावर झेरॉक्सचा व्यवसाय असलेले मुळचे रसूलभाई सय्यद दिव्यांग  जनता दलाचे जिल्हाध्यक्ष आहेत. या संघटनेचा मेळावा १४ ऑक्टाेबर रोजी असून, याच दिवशी शाखेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या शाखेच्या उद्घाटनाचे निमंत्रण देण्यासाठी ते सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे गेले होते. दिव्यांग बांधवाला पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना कार्यालयात येऊ देण्याची परवानगी दिली.

 रसुलभाई दोन पायाने आणि एका हाताने दिव्यांग आहेत. ते एका हातावर चालत जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले होते. त्यांना खुर्चीवर बसता येत नसल्याने जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी त्यांची खुर्ची सोडली. रसुलभाई यांच्याजवळ मांडी घालून खाली बसून त्यांनी संवाद साधला. त्यानंतर रसुलभाई यांच्या विनंतीवरून फोटो काढण्याची परवानगी दिली.

 जिल्हाधिकारी दिवेगावकर यंाच्या या साधेपणाची दिवसभर सोशल मीडियावर चर्चा सुरू होती. अधिकारी सामान्य नागरिकांना भेटी टाळतात, शिवाय भेटल्यानंतर त्यांचे ऐकूण घेत नाहीत. मात्र, भेटण्यासाठी आलेल्या प्रत्येकांचे मत ऐकूण घेण्याचा जिल्हाधिकारी दिवेगावकर यांचा स्वभाव लोकांना भावतो. महिनाभरातच कामकाजात अनेक सकारात्मक बदल केले आहेत. कोरेाना नियंत्रणासाठी त्यांनी आरोग्य व्यवस्था सुधारण्यावर अधिक भर दिला आहे.प्रशासकीय कामकाज करताना सामान्य नागरिक केंद्रबिंदू मानला आहे.


असा अधिकारी पाहिला नाही, माणुसकी जिवंत आहे...

रसुलभाई सय्यद यांच्याशी संपर्क साधल्यानंतर ते म्हणाले, दिव्यांग जनता दल सामाजिक संघटनेच्या शाखेचे उस्मानाबादेत उद्घाटन करायचे आहे. त्यासाठी निमंत्रण देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यंाकडे गेलेा होतो. त्यांनी दिलेली वागणूक ही माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय घटना आहे. असा अधिकारी कधीही पाहिली नाही. आता मी दिव्यांग नाही तर माझ्या अंगात हत्तीचे बळ आले आहे. जगात माणुसकी आहे, चांगली माणसं आहेत, अधिकाऱ्यंामध्ये माणुसकी आहे, याचा प्रत्यय आला.दिवेगावकर सरांबद्दल बोलण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत.


From around the web