गिरवलीच्या कोरोनाग्रस्त तरुणाचा मृत्यू

 
गिरवलीच्या  कोरोनाग्रस्त तरुणाचा मृत्यू


भूम - भूम तालुक्यातील गिरवली येथील एका २८ वर्षीय कोरोनाग्रस्त तरुणाचा अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला आहे. भूम तालुक्यातील कोरोनामुळे झालेला हा पहिलाच मृत्यू आहे. जिल्ह्यात कोरोनाचा हा बारावा बळी आहे.


उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. आतापर्यंत २२८ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून पैकी १७३ बरे झाले आहेत, मात्र बारा जण दगावले आहेत.

गिरवली (ता. भूम) येथील २८ वर्षीय तरुणाची प्रकृती खराब वाटल्यामुळे हा तरुण ईट (ता. भूम) येथील संजीवनी हॉस्पिटल या खासगी  रुग्णालयामध्ये तीन दिवस येथे उपचार घेतले. त्या ठिकाणी काहीच फरक पडला नसल्यामुळे पुढील उपचारासाठी त्याच्या भावाकडे अंबाजोगाई येथे उपचारासाठी गेला. आंबाजोगाई येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात त्याने उपचार घेतले.


त्या ठिकाणी स्वॅब घेतल्यानंतर शुक्रवारी (ता. २६) त्याला कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्याचा  कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. त्यानंतर कोरोनाशी झुंज देताना त्याचा मंगळवारी (ता. ३०) उपचारादरम्यान मृत्यू झाला. या तरुणाचा ईट परिसरातील अनेकांशी संपर्क  असल्यामुळे मृत्यूच्या बातमी काळतच ईट परीसरामध्ये लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना अपडेट

कोरोना बाधित रुग्ण -२२८
बरे झालेलं रुग्ण -१७३
मृत्यू - १२
ऍक्टिव्ह रुग्ण 4३

उस्मानाबाद लाइव्ह वरील बातम्या जलद गतीने वाचण्यासाठी आमचा नवीन अँप डाऊनलोड करा. 

Osmanabad Live New App

From around the web