प्रिय बाबा, लवकर बरे व्हा...

 
कोरोना बाधित  शिवसेना आमदार ज्ञानराज चौगले यांच्या मुलीचे पत्र होतंय  प्रचंड व्हायरल...


प्रिय बाबा, लवकर बरे व्हा...उमरगा लोहारा विधानसभेचे आमदार ज्ञानराज चौगुले यांना कोरोना ची लागण झाली आहे. सध्या त्यांच्यावर मुंबई येथे उपचार चालु आहेत. दरम्यान आमदार चौगुले यांची कन्या आकांक्षा चौगुले हिने आपल्या वडिलांना धीर देत एक भावनिक पोस्ट केली आहे. ती पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे.

आकांक्षा चौगुले हिची पोस्ट - 

प्रिय बाबा, लवकर बरे व्हा...

       एक राजकीय नेतृत्व म्हणुन उदयास येताना तुमच्या कुठल्याही यादीतील प्रथम व अंतिम हे समान असतात. त्याची मांडणी एकावर एक नसुन ती समांतर असते. तुमचे कुठलेही कर्म हंगामी नसते तर ते शाश्वत असते आणि त्यात नेहमी हिताच्याच बाबींचा हिशोब असतो हे सगळे करत असताना शेवटी महामारीने सुद्धा तुमची परीक्षा पाहण्याचे ठरवले. पण, तुमच्या सारखा लढवय्या, अनुभव आणि कणखर आरोग्याच्या आधारावर ह्या विव्हातुन नक्कीच बाहेर पडेल हा विश्वास आहे.

              बाबा तुम्ही नेहमी म्हणता "हा देह समाजाच्या चरणावर वाहिला आहे. निर्माल्य होईपर्यंत सेवा देईल" तुमच्या आरोग्यासाठी काहींनी देव पाण्यात ठेवले तर काहींनी नवस बोलले. तुम्ही सामान्य माणसाच्या मनात आधारवड म्हणून विराजमान आहात.. मला खात्री आहे की तुम्ही हॉस्पिटलमध्ये असून सुद्धा तेथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांची विचारपुस करत असाल त्यांना काय हवय ह्याची सोय लावत असाल. तरी बाबा तुम्ही लवकर बरे व्हा कारण अजुन खुप जनता आपली वाट पाहत आहे.

     बाबा आपल काळीजच नाही तर छाताड सुद्धा वाघच आहे. बाळासाहेबांचा आशीर्वाद आणि उद्धव ठाकरे साहेबांसारखे सरसेनापती लढत असताना आपल्या सारख्या मावळ्याला नियती सुद्धा जास्त दिवस अंथरुणाला खिळून ठेवणार नाही.

       कोरोना एकदा येऊन जाणारा पाहुणा नाही तो नेहमी येतच राहणार त्यासाठी तुम्ही बरे होणे गरजेचे आहे. आपला मतदारसंघ तुमच्याकडे डॉक्ट्रच्याच नजरेने बघतो. असा डॉक्टर जो रोग होण्याआधी माय बाप जनतेची काळजी घेतो. तुम्ही लवकर बरे व्हा बाबा....तुम्ही लवकर बरे व्हा...

तुमची लाडकी,
आकांक्षा

प्रिय बाबा, लवकर बरे व्हा.. एक राजकीय नेतृत्व म्हणुन उदयास येताना तुमच्या कुठल्याही यादीतील प्रथम व...

Posted by Aakanksha Chougule on  Saturday, August 1, 2020

From around the web