कळंबमधून बेपत्ता झालेली नऊ वर्षीय भाग्यश्री 48 तासांत पालकांच्या ताब्यात 

 
कळंबमधून बेपत्ता झालेली नऊ वर्षीय भाग्यश्री 48 तासांत पालकांच्या ताब्यात

कळंब: कळंब येथील एसटी कॉलनी परीसरात राहनारी भाग्यश्री सतीष कनगरे ही 9 वर्षीय बालीका दि. 08 मे रोजी 14.00 वा. सु. आपल्या घरासमोर खेळत होती. त्यानंतर ती दिसेनासी झाल्याचे कुटूंबीयांच्या लक्षात आले. यावर कुटूंबीयांनी गल्ली परिसरात तीचा शोध घेतला असता तीच्याबाबत माहिती मिळाली नाही. यावर कुटूंबीयांनी 23.30 वा. कळंब पोलीस ठाणे गाठून घडला प्रकार सांगीतला असता लागलीच पोलीसांनी तीचे पिता- सतीश कनगरे यांची प्रथम खबर नोंदवून बालक अपहरणाचा गुन्हा क्र. 168 / 2021 हा भा.दं.सं. कलम- 363 प्रमाणे दाखल केला.

            रात्रगस्तीस असलेले कळंब पो.ठा. चे सपोनि- पवार व अन्य पोलीस अंमलदार यांनी भाग्यश्री हिच्या नातेवाईकांना सोबत घेउन लागलीच शोध मोहिम सुरू केली. पोलीस अधीक्षक  राज तिलक रौशन, अपर पोलीस अधीक्षक श्री संदीप पालवे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि- दराडे, सपोनि- पवार, पाटील यांच्या नेतृत्वात पोलीसांची 3 पथके तयार करण्यात आली. या पथकांत सपोफौ- पिलंगवाड, पोहेकॉ- तांबडे, पोना- राऊत, कोळेकर, हांगे, पठाण, दळवी, वाघमोडे, राऊत, शेख, शिरसठ यांचा समावेश होता. मदतीस स्था.गु.शा. च्या सपोनि- निलंगेकर यांचे पथक आले होते.

            नमूद तीन्ही पथकांनी भाग्यश्री हिचे छायाचित्र व ती बेपत्ता झाल्याची बातमी व बेपत्ता होतांना भाग्यश्रीची केशरचना व पोशाख हा मुलाचा असल्याचे स्थानिक पोलीस पाटील, ग्राम सुरक्षादले, पोलीस मित्र, कोरोना वॉरियर्स यांच्या व्हाट्सॲप गटांत प्रसारीत करुन तीच्या विषयी माहिती मिळाल्यास पोलीसांत कळवण्याचे आवाहन केले. या बेपत्ता प्रकरणाची माहिती सीमावर्ती असलेल्या बीड व लातूर जिल्हा पोलीसांना कळवण्यात आली.

 दि. 09 मे रोजी श्वानपथक येथील  पोलीस  श्वान हस्तक स्वप्नील ढोणे व सुरज कोरडे यांना ‘प्लुटो’ या माग काढणाऱ्या श्वानासह भाग्यश्रीच्या घरी बोलावण्यात आले. यावेळी भाग्यश्री हिची घरातील टोपी ‘प्लुटो’ श्वानास हुंगण्यास देण्यात आली. यावर श्वानाने भाग्यश्री ही घर- मोंढा- होळकर चौक अशी गेल्याचा माग दाखवला. पथकाने तात्काळ त्या मार्गावरील विविध ठिकाणाच्या दुकानांचे सीसीटीव्ही छायाचित्रन तपासले असता भाग्यश्री ही हातामध्ये एक पिशवी घेउन घरापासून उपरोक्त नमूद मार्गे एकटी चालत गेल्याचे दिसले. मार्गावरील एका पेट्रोलीयम विक्री केंद्राचे सीसीटीव्ही छायाचित्रन अभ्यासले असता भाग्यश्री ही एका मोटारसायकल स्वारासोबत हासेगावच्या दिशेने गेल्याचे समजले. पथकाने ती मोटारसायकल शोधून त्यास विचारपुस केली असता त्याने त्या मुलीच्या विनंतीवरुन तीला मोटारसायकलद्वारे हासेगाव येथील ईटकुर तीठ्यावर सोडल्याचे सांगीतले.यावर पथकाने शोध मोहिमेची दिशा परिसरातील हासेगाव, हावरगाव, ईटकुर, वाकडी या गावांकडे वळवून रात्री 23.00 वा. पर्यंत गावकऱ्यांकडे विचारपूस केली असता उपयुक्त माहिती मिळाली नाही.

            9 वर्षीय मुलगी असल्याने पोलीस पथक आपले बालकच हरवले आहे अशा तळमळीतून भाग्यश्रीचा शोध घेणाऱ्या पथकाच्या प्रयत्नांना यश आले. पोलीसांनी वर्णन केलेला एक मुलगा. हासेगाव- आंदोरा रस्त्यावरील एका पुलाजवळ फिरत असल्याचे दि. 10 मे रोजी 17.00 वा एका मोटारसायकल स्वाराने पोलीसांना सांगीतले. यावर सपोनि- पाटील यांच्या पथकाने तेथे जाउन पाहता तो मुलगा नसून ती बेपत्ता भाग्यश्री असल्याने तीला पथकाने ताब्यात घेतले. वडील आईसोबत वारंवार भांडत असल्याने मी पिशवीत माझे कपडे घेउन घर सोडून आली आहे. तसेच गेली दोन दिवस मी या पुलाखाली राहत असुन बेपत्ता झाल्यापासून पुलाजवळील एका मंदीरात पाणी पिउन राहत असुन उपाशी असल्याचे सांगीतले. यावर पथकाने तीला तात्काळ ग्लुकोज पाणी व अन्न देउन तीला पो.ठा. कळंब येथे आणुन तीच्या आई- वडीलांच्या ताब्यात दिले.

आज दि. 11 मे रोजी मा. पोलीस अधीक्षक  राज तिलक रौशन यांनी कळंब पो.ठा. येथे भेट देउन भाग्यश्री व तीच्या कुटूंबीयांची विचारपुस केली. तसेच भाग्यश्रीचा यशस्वी शोध घेतल्याबद्दल त्यांनी कळंब पो.ठा. च्या अधिकारी- अंमलदारांचे अभिनंदन केले.  

From around the web