उस्मानाबादेत दुचाकी वाहनासाठी नवीन मालिका सुरु 

 दुचाकी वाहनांसाठी हा मिळणार नवीन क्रमांक 
 
उस्मानाबादेत दुचाकी वाहनासाठी नवीन मालिका सुरु

उस्मानाबाद -उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,उस्मानाबाद या कार्यालयात लवकरच दुचाकी वाहनांसाठी MH25AU ही नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. वाहनांची नवीन मालिका चालू होण्याच्या दिवशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची गर्दी होते त्यामुळे कार्यालयीन व्यवस्थेवर त्याचा ताण पडतो. ब-याच वेळा नागरिकांनाही याचा त्रास होतो, नागरिकांचा होणारा त्रास हि कमी व्हावा.त्यांना हवा असणारा आकर्षक नोंदणी क्रमांक उपलब्ध असल्यास त्यांना सुलभतेने तो निळावा,यासाठी ज्या वाहनमालकांना आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क भरुन हवे असतील त्यांनी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी आकरा ते दुपारी चार वाजेच्या या दरम्यान विहित नमुन्यातील अर्ज सादर करावेत,असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांनी केले आहे.    

         अर्जासोबत केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम चार तसेच महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 च्या नियम पाच अ मध्ये विहित केलेल्या पत्याच्या पुराव्याची साक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक असेल. (उदा. लाईट बील, टेलीफोन बील इ) तसेच आकर्षक क्रमांकासाठी देय असलेल्या विहित शुल्काच्या डी.डी. अर्जासह जमा करणे बंधनकारक आहे. सदर डीडी फक्त Deputy Regional Transport Officer,Osmanabad याच्या नावे केवळ Nationalize बँकेचा असावा. या व्यतीरिक्त इतर नावाचे डी.डी.बाद ठरवले जातील.       

      डीडी व्यतिरिक्त बँकेने जारी केलेले बँकचे चेक स्वीकारले जाणार नाहीत. डीडी कमीत-कमी एक महिना मुदतीमधील असावा.एकाच नंबर करीता एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास त्यांची यादी कार्यालयीन नोटीसबोर्डदार लावण्यात येईल. या यादीतील अर्जदारांना लिलावाकरिता जर अतिरिक्त रक्कमेचा डी.डी. जमा करावयाचा असेल तर त्यांनी सोबतच्या वेळापत्रकानुसार दर्शविलेल्या दिवशी सीलबंद लिफाफयात कार्यालयात जमा करावा. लिलावासाठी सादर केलेला अतिरिक्त रक्कमेचा डी.डी. रुपये 370 रुपयांपेक्षा कमी नसावा, सदर डीडी फक्त Deputy Regional Transpori Officer,Osmanabad याच्या नांवे केवळ Nationalize बँकेचा असावा. या व्यतिरिक्त इतर नावाचे डी.डी.बाद ठरवले जातील, डीडी कमीत-कमी एक महिना मुदतीमधील असावा. अतिरिक्त रक्कमेचे संबंधीत अर्जदाराकडून प्राप्त झालेले 'डी.डी.चे लिफाफे अर्जदार/प्रतिनिधी यांच्या समक्ष व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,उस्मानाबाद यांच्या उपस्थितीत उघडले जातील.ज्या अर्जदाराने अधिक रक्कमेचा डीडी सादर केला असेल त्यास सदरचा पसंती क्रमांक वितरीत केला जाईल.

        एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही, नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर करुन वाहन क्रमांक प्राप्त करुन घ्यावा. अन्यथा राखून ठेवलेल्या नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व फी शासनजमा होईल. कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेली फी कोणत्याही परिस्थितीत परत करता येणार नाही अथवा त्याचे समायोजन करता येणार नाही.

       आकर्षक तसेच पसंतीच्या क्रमांकासाठीचे विहित नमुन्यातील अर्ज तसेच प्रतिनिधी येणार असल्यास प्रतिनिधीचे प्राधिकारपत्र याचा नमुना कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेमध्ये उपलब्ध आहे.

                                  

From around the web