पोस्ट कोविड केयर मार्गदर्शनासाठी तेरणा ट्रस्टची हेल्पलाईन...!

 

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आ.राणा जगजितसिंह पाटील यांचा उपक्रम

 पोस्ट कोविड केयर  मार्गदर्शनासाठी तेरणा ट्रस्टची हेल्पलाईन...!

 

उस्मानाबाद - भारतात एकात्म मानववाद रुजवणारे नेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीच्या निमित्ताने आ.राणाजगजीतसिंह पाटील यांच्या पुढाकाराने कोविड -१९ मधून बरं झाल्यानंतर रुग्णांना काही समस्या उद्भवत असल्यास मार्गदर्शन अथवा सल्ला घेण्यासाठी तेरणा ट्रस्ट च्या माध्यमातून हेल्पलाइन सुरू करण्यात आली असून गरजूंनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आ. राणाजगजितसिंह पाटील  यांनी केले आहे. ज्या रुग्णांना पोस्ट कोविड केयर ची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी सकाळी ९ ते सायं ९ पर्यंत ८८५०१६६९६० या नंबरवर सदरील हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. तेरणा हॉस्पिटल चे डॉक्टर्स त्यांना याबाबत योग्य ते मार्गदर्शन करतील.

आरोग्य क्षेत्रातील तज्ञांच्या माहिती नुसार जे लोक कोरोनाच्या संक्रमणातून बाहेर आले आहेत अशा  व्यक्तींना हृदय, किडनी, लिव्हर यांसंबंधी समस्या उद्भवत आहेत. तर कांही रुग्णांना फुफ्फुसांची समस्या उद्भवते. या आजारात  फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होते. परिणामी श्वास घ्यायला त्रास  होतो. त्यामुळे कोरोनातून बाहेर आल्यानंतरही अशा रुग्णांना ऑक्सिजन सपोर्टची आवश्यकता भासू शकते. 

सरकारने नेमलेल्या टास्क फोर्स चे प्रमुख डॉ.संजय ओक यांनी दिलेल्या माहितीनुसार  बरे होऊन घरी गेलेल्या काही रुग्णांच्या शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार होत असल्याचे समोर आले आहे. परिणामी काहींना ह्रदयविकाराने प्राण गमवावा लागला आहे. या गुठळ्या शरीरात दूरवर पसरलेल्या रक्तवाहिन्यांमध्ये देखील होत आहेत. काही रुग्णांमध्ये  मेंदूकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या झाल्याने पक्षाघात होण्याचे प्रमाणही वाढत आहे.

त्यामुळे कोविड-१९ तुन बरं झाल्यानंतर उद्भवत असलेल्या आजारांपासून बचावासाठी रूग्णांना योग्य तो वैद्यकीय सल्ला व उपचार मिळावा यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करणे आवश्यक असल्याचे लक्षात आल्याने आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचालित नवी मुंबई स्थित "तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल" मध्ये "Community Medicine Department" च्या माध्यमातून टेलीमेडिसीन चा वापर करून बरे झालेल्या रुग्णांसाठी अशी व्यवस्था कार्यान्वित केली आहे.

कोविड-१९ मधून बरं झालेल्या रुग्णांनी नंतरचे ४ महिने काळजी घेणे आवश्यक आहे, असे आता वेगवेगळ्या निष्कर्षातून समोर आले आहे. त्यामुळे अशा रुग्णांना दिलासा मिळावा यासाठी शासनाने प्रत्येक जिल्ह्यात ‘पोस्ट कोवीड केयर सेंटर‘ तयार करावी व राज्यातील सर्व सरकारी व खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात टेलीमेडिसीन पद्धतीचा वापर करून एक स्वतंत्र यंत्रणा उभी करावी अशी मागणी आ.पाटील यांनी आरोग्यमंत्र्यांकडे दि २६ ऑगस्ट २०२० रोजी केली आहे.

समाजातील शेवटचा घटक हा कोणत्याही योजनेचा केंद्रबिंदू असला पाहिजे, त्याच्या विकासासाठी शासनव्यवस्थेने कशाप्रकारे विचार केला पाहिजे हे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी त्यांच्या वाङमयातून दाखवून दिले आहे. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ठेवणारे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे जीवनमान होते. अशा महान व्यक्तीमत्वाची जयंती निमित्ताने हा उपक्रम चालू केला असून नागरिकांनी ८८५०१६६९६० या नंबरवर संपर्क साधत याचा लाभ घ्यावा असे आवाहन आ.पाटील यांनी केले आहे.

From around the web