सेन्सेक्सची ५५८ अंकांनी उसळी; निफ्टीतही १६८ अंकांनी वाढ

 
सेन्सेक्सची ५५८ अंकांनी उसळी; निफ्टीतही १६८ अंकांनी वाढ

मुंबई, २८ जुलै २०२०:  बेंचमार्क निर्देशांकांनी आज मागील नुकसान भरून काढले आणि हिरव्या रंगात व्यापार केला. बाजाराला आज वाहन, आयटी, फार्मा आणि धातूच्या स्टॉक्सनी आधार दिला. निफ्टी १.५२% किंवा १६८.७५ अंकांनी वाढला आणि ११,३००.५५ वर स्थिरावला. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्स १.४७% किंवा ५५८.२२ अंकांनी वाढला व तो ३८,४९२.९५ वर स्थिरावला.
एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह  यांनी सांगितले की आज जवळपास १३१५ शेअर्सनी वृद्धी घेतली, १३०० शेअर्स घसरले तर १५१ शेअर्स स्थिर राहिले. अल्ट्राटेक सिमेंट (७.०२%), कोटक महिंद्रा बँक (४.७०%), टाटा मोटर्स (४.४२%), टीसीएस (४.६९%), आणि ग्रासिम इंडस्ट्रिज (४.५९%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले. तर दुसरीकडे, भारती इन्फ्राटेल (१.६२%), आयसीआयसीआय बँक (१.७७%), ओएनजीसी (०.८७%), नेस्ले (१.४२%) आणि एशियन पेंट्स (१.२२%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले. सर्व क्षेत्रीय निर्देशांकांनी आज सकारात्मक व्यापार केला. बीएसई मिडकॅप ०.७६% नी आणि बीएसई स्मॉलकॅप ०.६१% नी वाढले.
मेरिको लिमिटेड:  मेरिको लिमिटेड कंपनीचे स्टॉक्स ३.११% नी वाढले व त्यांनी ३६१.३५ रुपयांवर व्यापार केला. कंपनीने २०२१ या वित्तीय वर्षाच्या पहिल्या तिमाहीत, मजबूत उत्पन्न कमावले. याकाळात कंपनीने एकत्रित निव्वळ नफ्यात २३.२% ची वृद्धी कमावली.
कोटक महिंद्रा बँक:  बँकेचे २०२१ या वित्तीय वर्षातील पहिल्या तिमाहितील उत्पन्न स्थिर राहिले. त्यामुळे कोटक महिंद्र बँकेचे शेअर्स ४.७०% नी वाढले व त्यांनी १,३८४ रुपयांवर व्यापार केला.
भारती इन्फ्राटेल:  भारती इन्फ्राटेलचे शेअर्स १.६२% नी घसरले व त्यांनी १९१.१० रुपयांवर व्यापार केला. कारण कंपनीचा २०२१ या वित्तीय वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील निव्वळ नफा २१% नी घसरला.
टाटा मोटर्स:  आजच्या व्यापारी सत्रात टाटा मोटर्सच्या स्टॉक्समध्ये ४.४२% ची वाढ झाली व त्यांनी १०६.२० रुपयांवर व्यापार केला. कंपनीने थेअरी बोलोर यांना जग्वार लँड रोव्हरचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली.
हेवेल्स इंडिया:  कंपनीचा २०२१ या वित्तीय वर्षातील पहिल्या तिमाहीचा एकत्रित निव्वळ नफा ६३.८७% नी घसरला. तसेच कंपनीच्या थेट विक्रीतही ४५.४% ची घट दिसून आली. परिणामी हेवेल्स कंपनीचे स्टॉक्स ३.०६% नी घसरले व त्यांनी ५७७.०० रुपयांवर व्यापार केला.
भारतीय रुपया:  देशांतर्गत इक्विटी बाजारात सकारात्मक संकेत दिसल्याने अमेरिकी डॉलरच्या तुलनेत आजच्या व्यापारी सत्रात भारतीय रुपयाने फ्लॅट कामगिरी करत ७४.८३ रुपयाचे मूल्य कमावले.
सोने:  देशांतर्गत बाजारात सोन्याच्या दरांनी आजपर्यंतची उच्चांकी म्हणजेच ५२,४३५ रुपयांची पातळी गाठली. पिवळ्या धातूने आंतरराष्ट्रीय बाजारात १९८१.१० डॉलर प्रति औंस एवढा वाढीव उच्चांक गाठला.
जागतिक बाजार:  आशियाई आणि युरोपियन बाजाराने अमेरिका-चीन दरम्यानच्या तणावामुळे आज संमिश्र ट्रेंड दर्शवला. नॅसडॅकचे शेअर्स १.६७%, हँगसेंगचे शेअर्स ०.६९% नी वाढले. तर निक्केई २२५ चे शेअर्स ०.२६% नी घसरले. तर दुसरीकडे, एफटीएसई १०० चे शेअर्स ०.१८% नी वाढले तर एफटीएसई एमआयबीचे शेअर्स ०.८४% नी घसरले.

From around the web