९०० रुपयाचे अडीच ग्रॅमचे मंगळसूत्र २२ वर्षानंतर परत मिळाले... 

वाकरवाडीच्या  शंकुतलाबाई  शिंदे यांची संघर्षमय कहाणी 
 
९०० रुपयाचे अडीच ग्रॅमचे मंगळसूत्र २२ वर्षानंतर परत मिळाले...

उस्मानाबाद - उस्मानाबाद तालुक्यातील वाकरवाडी येथील शंकुतलाबाई विठ्ठल शिंदे या सन १९९८ मध्ये येरमाळा येथे यात्रेला गेल्या असता त्यांच्या गळ्यातील ९०० रुपयाचे अडीच ग्रॅमचे मंगळसूत्र गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी लंपास केले होते.तब्बल २२ वर्षानंतर न्यायालयाचे अनेकवेळा उंबरठे झिजवल्यानंतर त्यांना हे मंगळसूत्र परत मिळाले. शंकुतलाबाईंनी ऊस तोडणी करून ९०० रुपयांचे अडिच ग्रॅम सोने खरेदी केले होते. पोलिसांनी चोरट्याकडून पकडलेले सोने परत घेण्यासाठी वकिलांना ५०० रूपये द्यावे लागले. यासाठी  पोलिस स्टेशनच्या आणि न्यायायलयाच्या कित्येक फेऱ्या त्यांना घालाव्या लागल्या होत्या.

उस्मानाबाद तालुक्यातील वाकरवाडी येथील शंकुतलाबाई विठ्ठल शिंदे या सन १९९८ मध्ये येरमाळा येथे यात्रेला गेल्या असता त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी तत्कालीन कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. शकुंतलाबाई व पती विठ्ठल शिंदे हे दाम्पत्य शेतात काम करून तसेच ऊसतोडणी करून उदरनिर्वाह करत होते. यातूनच बचत करत त्यांनी ९०० रुपयांची अडीच ग्रॅमचे मंगळसूत्र केले होते. 

१३ जुलै २०१९ ला शकुंतला बाईच्या अडीच ग्रॅम मंगळसुत्राचे प्रकरण न्यायालयीन सुनावणीला आले. त्यानंतर कळंब न्यायालयात लोक अदालत झाली. तेव्हा याच लोक अदालतीने महिलेस मंगळसूत्र परत करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले. त्यानंतर मंगळवार २ मार्च रोजी शकुंतला शिंदे यांना त्यांच्या पतीच्या उपस्थितीत पोलिसांनी परत दिले. ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी शकुंतलाबाईंना वकिलाची फीस ५०० रूपये द्यावी लागली. कित्येक फेऱ्या पोलिस स्टेशनच्या आणि न्यायायलयाच्या कराव्या लागल्यात. यामुळे राज्यातील व्यवस्था कशी काम करते याचा उत्तम नमुना पाहण्यास मिळाला आहे.

शकुंतला विठ्ठल शिंदे, रा. वाकरवाडी, ता. उस्मानाबाद यांचे 2.5 ग्रॅम सोन्याचे मंगळसुत्र चोरीस गेल्याने कळंब पो.ठा. येथे भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गु.र.क्र. 85 / 1998 हा दाखल होता. तपासात आरोपीच्या ताब्यातून नमूद मंगळसुत्र जप्त करण्यात येउन आरोपी विरुध्द न्यालयात दोषारोपपत्र पाठवण्यात आले होते. नमूद गुन्ह्याची सुनावणी कळंब न्यायालयातील लोकअदालतीत दि. 13.07.2019 रोजी झाली असता मुळ मालकास दागिने परत करण्याचा न्यायालयीन आदेश झाला होता. त्‍यास अनुसरुन कळंब पो.ठा. च्या पथकाने शकुंतला विठ्ठल शिंदे यांच्याशी संपर्क साधला. 2 मार्च रोजी कळंब पोलीस ठाणे येथे पोनि- तानाजी दराडे यांच्या हस्ते ते मंगळसुत्र त्यांना  परत करण्यात आले. 22 वर्षानंतर आपले मंगळसुत्र परत मिळाल्याने शकुंतला शिंदे यांचे डोळे आनंदाने पानावले.

From around the web