उस्मानाबाद जिल्हयातील 623 पैकी 320 ग्रामपंचायतींमध्ये महिला राज

अनुसूचित जातीतील 53 तर अनुसूचित जमातीच्या नऊ महिलांना संधी
 
उस्मानाबाद जिल्हयातील 623 पैकी 320 ग्रामपंचायतींमध्ये महिला राज

 ओबीसी महिलांसाठी 86 तर खुल्या प्रवर्गातील 172 महिलांना सरपंच पदाची संधी 

उस्मानाबाद :-महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 1964 मधील नियम-3-(अ),ब तसेच 4 प्रमाणे तालुका निहाय जिल्हयातील 622 ग्रामपंचायती वेगवेळया प्रवर्गासाठी  व महिलासाठीच्या सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.त्यानुसार 622 पैकी अनुसूचित जातींच्या माहिलासाठी 53,अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी नऊ,नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) 86 जर खुल्या प्रवर्गातील 172 महिलांना सरपंच पदाचे आरक्षण मिळणार आहे.अशी अधिसूचना जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी जारी केली आहे.

 हे आरक्षण निश्चित करताना त्या त्या तालुक्यातील अनुसूचित जाती,जमाती,नागरिकांचा मागासप्रवर्ग आणि सर्वसाधारण प्रवर्गाच्या व्यक्तींसाठी त्या त्या जाती,जमाती व प्रवर्गीय महिलांसाठी ग्रामपंचायतींची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार निश्चित केली आहे.

 तालुक्यातील ग्रामपंचायतींमधील सरपंच पदे अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती,नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण प्रवर्ग यासाठी राखीव ठेवताना,महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच ) निवडणूक नियम 1964 मधील नियम 5 व 6 मध्ये नमुद तरतुदी तसेच ग्रामविकास विभागाने वेळोवेळी निर्गमीत केलेले शासन निर्णय,आदेश आणि परिपत्रकानुसार सरपंच पदाच्या आरक्षणाची कार्यवाही  नियमानुसार पूर्ण करावी,असे आदेशही जिल्हाधिकारी यांना जिल्हयातील सर्व तहसीलदारांना दिले आहेत.

  जिल्हयातील अनुसूचित जातीतील सर्वसाधारण घटकासाठी 48,अनुसूचित जमातीतील सर्वसाधारण घटकासाठी पाच,नागरिकांच्या मागास प्रवर्गातील सर्वसाधारण घटकातील प्रवर्गासाठी 82,तर खुल्या प्रवर्गातील सर्वसाधारण घटकासाठी 167 सरपंचाची पदे असतील.उस्मानाबाद तालुक्यातील अनुसूचित जातीतील सर्वसाधारण घटकासाठी नऊ,महिलांसाठी दहा,अनुसूचित जमातीतील सर्वसाधारण घटकासाठी दोन,तर महिलांसाठी दोन, नागरिकांच्या मागास प्रवर्गातील सर्वसाधारण घटका आणि महिलांसाठी  प्रत्येकी

15,खुल्या प्रवर्गातील सर्वसाधारण घटक आणि महिलांसाठी  प्रत्येकी 29 असे सरपंच पदाचे आरक्षण असेल.

 तुळजापूर तालुक्यातील एकूण-108 सरपंच पदांपैकी अनुसूचित जातीतील  सर्वसाधारण घटकासाठी आणि महिलांसाठी प्रत्येकी नऊ,अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी एक,नागारिकांच्या मागास प्रवर्गातील सर्वसाधारण घटकासाठी 14 तर महिलांसाठी 15,खुल्या प्रवर्गातील सर्वसाधारण घटकासाठी आणि महिलांसाठी प्रत्येकी 30 असे सरपंच पदाचे आरक्षण असेल.उमरगा तालुक्यातील एकूण-80 सरपंचपदापैकी अनुसूचित जातीसाठी  सर्वसाधारण घटकासाठी –सहा तर महिलासाठी सात, अनुसूचित जमातीच्या सर्वसाधारण घटकासाठी आणि महिलांसाठी प्रत्येकी एक,नागरिकांचा मागास प्रवर्गासाठीच्या सर्वसाधारण घटकासाठी आणि महिलांसाठी प्रत्येकी अकरा,खुल्या प्रवर्गातील सर्वसाधारण घटकासाठी 21 तर महिलांसाठी 22 सरपंच पदाचे आरक्षण असेल.

     लोहारा तालुक्यातील एकूण-44 सरपंचपदांपैकी अनुसूचित जातीच्या सर्वसाधारण आणि महिलांसाठी प्रत्येकी चार,अनुसूचित जमातीच्या सर्वसाधारणसाठी निरंक तर महिलांसाठी एक,नागरिकांच्या मागास प्रवर्गातील सर्वसाधारण घटकासाठी व महिलांसाठी प्रत्येकी सहा,खुल्या प्रवर्गातील सर्वसाधारण घटकासाठी अकरा तर महिलांसाठी बारा सरपंच पदाचे आरक्षण असेल.

      कळंब तालुक्यातील एकूण-91 सरपंचपदापैकी अनुसूचित जातीच्या सर्वसाधारण घटकांसाठी आठ तर महिलांसाठी नऊ,अनुसूचित जातीच्या सर्वसाधारण आणि महिलांसाठी प्रत्येकी एक,नागरिकांच्या मागास प्रवर्गातील सर्वसाधारण घटकांसाठी बारा तर महिलांसाठी तेरा,खुल्या प्रवर्गातील सर्वसाधारण घटकांसाठी 23 तर महिलांसाठी 24 सरपंच पदांचे आरक्षण असेल.

       भूम- तालुक्यातील एकूण-74 सरपंच पदापैकी अनुसूचित जातीतील सर्वसाधारण घटकासाठी आणि महिलांसाठी प्रत्येकी पाच,अनुसूचित जातीसाठी सर्वसाधारण घटकांसाठी निरंक तर महिलांसाठी एक,नागरिकांच्या मागास प्रवर्गातील सर्वसाधारण घटकासाठी आणि महिलासाठी प्रत्येकी दहा,तर खुल्या प्रवर्गातील सर्वसाधारण घटकासाठी 21 तर महिलांसाठी 22 सरपंच पदाचे आरक्षण असेल.

       परंडा तालुक्यातील एकूण-72 सरपंचपदांपैकी अनुसूचित जातीच्या सर्वसाधारण घटकासाठी  चार तर महिलांसाठी पाच,अनुसूचित जातीच्या सर्व साधारण घटकांसाठी निरंक तर महिलांसाठी एक,नागरिकांच्या मागास प्रवर्गातील  सर्वसाधारण घटकासाठी नऊ तर महिलासाठी दहा,तर खुल्या प्रवर्गातील सर्वसाधारण घटकासाठी 21 तर महिलांसाठी 22 सरपंच पदांचे आरक्षण असेल.

 वाशी तालुक्यातील एकूण-42 सरपंचपदांपैकी अनुसूचित जातीच्या सर्वसाधारण घटकासाठी तीन तर महिलांसाठी चार,अनुसूचित जमातीच्या सर्वसाधारण घटकासाठी आणि महिलांसाठी प्रत्येकी एक,नागरिकांच्या मागास प्रवर्गातील सर्वसाधारण घटकांसाठी पाच तर महिलासाठी सहा,खुल्या प्रवर्गातील सर्वसाधारण घटकासाठी आणि महिलांसाठी प्रत्येकी अकरा सरपंच पदांचे आरक्षण असेल.

                                   
 

From around the web