सावरगावच्या मधू राऊतची इंडिया हॅकेथॉन स्पर्धेसाठी निवड

 
सावरगावच्या मधू राऊतची इंडिया हॅकेथॉन स्पर्धेसाठी निवड

तामलवाडी -  तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील मधू राजेंद्र राऊत या विद्यार्थिनीची आसियान (एएसईएएन) इंडिया हॅकेथॉन 2021 स्पर्धेसाठी निवड झाली असून मधू राऊत ही पुण्याच्या खडकवासला येथील डिफेन्स इन्स्टिटूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नोलॉजी (डीयाएटी) या संस्थेत सायबर सिक्युरिटी (सीएसई) विभागातून एम.टेक.चे शिक्षण घेत आहे. 

देशभरातील 1 हजार 300 विद्यार्थ्यांमधून तीची निवड करण्यात आली आहे. या निवडी बद्दल तिचे परिसरातून व राज्यभरातून कौतुक केले जात आहे. शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेल च्या वतीने आयोजित केलेल्या स्मॉर्ट इंडिया हॅकेथॉन 2020 मध्ये यश मिळविणाऱ्या डीआएटी च्या एज ऑफ अल्ट्रॉन या संघातील ती सदस्य होती. 

गेल्या वर्षी या स्पर्धेत विजेत्या संघातील सर्व विद्यार्थ्यांची ऑनलाइन तांत्रिक परीक्षा व मुलाखती घेण्यात आल्या होत्या. ही संपूर्ण प्रकिया यशस्वीपणे पूर्ण करत आसियान इंडिया हॅकेथॉन साठी देशभरातून निवडलेल्या 50 विद्यार्थ्यांमधून मधू राऊतची निवड करण्यात आली आहे. यासाठी तिला डॉ.सुनिता ढवळे यांनी मागदर्शन केले. 

शिक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्राच्या सहकार्याने देशात आर्थिक विकासासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये दहा देशातील विद्यार्थी सहभाग घेणार असून ही स्पर्धेचा वेळ 26 मिनिटांचा असणार आहे. मधू हि भारताच्या संघाचे प्रतिनिधीत्व करणार आहे. या संघात सिंगापूर, व्हिएतनाम, थायलंड  आणि फिलिपिन्समधील सदस्यांचा सहभाग असणार आहे. ही स्पर्धा 1 फेब्रुवारी 4 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे.  
 

From around the web