ऐतिहासिक घसरणीतही फार्मा कंपन्यांनी धरला तग

 
ऐतिहासिक घसरणीतही फार्मा कंपन्यांनी धरला तग

मुंबई -   आंतरराष्ट्रीय बाजारात मंगळवारी दहशतीचे वातावरण होते. याचे केंद्र होते कुशिंग आणि ओकलाहामा. डब्ल्यूटीआय कच्चे तेल सोमवारी ९९ टक्क्यांनी घसरले. जगभरात विशेषत: आशियाई बाजाराला याचा तडाखा बसला. अशा परिस्थितीही फार्मा कंपन्यांनी बाजाराला फ्री फॉलपासून वाचवल्याचे एंजल ब्रोकिंगचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले. एका बाजूला बँकिंग, ऑटोसह विविध क्षेत्रातील समभागांची घसरण सुरु असताना फार्मा कंपन्यांनी मात्र तग धरला होता.
एनएसईमध्ये निफ्टी फार्मा इंडेक्सने सकारात्मक दाखवली. ती २.५४ टक्क्यांपेक्षा जास्त अंकांवर बंद झाली. अरबिंदो फार्माने १९.१२ टक्क्यांची बढत घेत इंडेक्सचे नेतृत्व केले. त्यानंतर डॉ. रेड्डीज लॅबरॉटरी, कॅडिला हेल्थ, दिविस लॅबरोटरीज आणि सिप्लाने अनुक्रमे ४.४६ टक्के, ३.३० टक्के, २.३७ टक्के आणि १.१४ टक्क्यांची वृद्धी केली. अलकेम लॅबरोटरीज, बायोकॉन आणि सन फार्मासारख्या इतर शेअर्समध्ये चढ-उतार दिसला आणि त्या उणे १ टक्क्यांवर बंद झाल्या.
मार्केट ओव्हरव्ह्यू:
आज एनएसईच्या ५० स्टॉक बेंचमार्क इंडेक्समध्ये ४३ शेअर्समध्ये घसरण दिसून आली. काही मोजके शेअर्स घसरले नाहीत, त्यात डॉ.रेड्डीज लॅबरोटरीज आणि सिप्लासारख्या फार्मास्युटिकल्स कंपन्या, ब्रिटानिया आणि नेस्लेसारख्या एफएमसीजी कंपन्या तसेच भारती एअरटेल व भारती इंफ्राटेल यांचाही समावेश आहे. सेन्सेक्समध्ये गुंतवणूकदारांच्या नकारात्मक भावनांमुळे तीन शेअर्स वगळता सर्वत्र घसरण दिसून आली. इंडसइंड बँक, बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बँक आणि अॅक्सिस बँकसारखे शेअर्स अनुक्रमे १२.३० टक्के, ९.०४ टक्के, ८.२८ टक्के आणि ७.६१ टक्क्यांच्या निगेटिव्ह रॅलीसह सर्वाधिक प्रभावित झाले.
बँक आणि ऑटो स्टॉकना बसला फटका:
आज सर्वाधिक नुकसान बँकिंग आणि ऑटो शेअर्सचे झाले. यात ५ टक्क्यांपेक्षा जास्त घसरण दिसून आली. पीएसयू बँकांनी खासगी बँकांच्या तुलनेत चांगले प्रदर्शन केले. आपले एकूण तोटा ४ टक्क्यांपेक्षा कमी ठेवला. यूको, जेअँडके बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियासह काही पीएसयू बँकांनी कच्च्या तेलाच्या बाजारात अंदाधुंद असतानाही १६.२७ टक्के, ७ टक्के आणि ५.६६ टक्क्यांची वाढ नोंदवली.
क्रूड मार्केटमध्ये कंटॅगो कंटेगियन:
सध्या आपण कच्च्या तेलाच्या बाजारात कंटॅगो नावाची स्थिती अनुभवत आहोत. येथे फ्यूचर कॉन्ट्रॅ्टपेक्षा स्पॉट किंमत कमी आहे. ओकलाहोमाच्या कुशिंगमध्ये गोदाम भरले आहेत. नवे तेल ठेवायला जागा नाही. गरजेपेक्षा जास्त पुरवठा झाल्यामुळे जागतिक तेल बाजारात बऱ्याच कालावधीपासून अस्थैर्य आहे. लॉकडाउनमुळे ही स्थिती आणखी बिकट झाली असून काही दिवसांपासून मागणीच प्रचंड घट झाली. यामुळे किंमतींमध्येही घसरण दिसून आली. असे झाले नसते तर जागतिक तेल पुरवठादार देशांदरम्यान किंमत युद्धामुळे बाजाराला आणखी नुकसान झाले असते.
सोमवारी गोदामांमध्ये जागा नसल्यामुळे डब्ल्यूटीआय क्रूडच्या किंमती घसरून उणे ३७.६३ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या. तेल उत्पादकांना आपल्या गोदामातून तेल घेऊन जाण्यासाठी इतरांना पैसे द्यावे लागतील, एवढी नकारात्मक स्थिती सध्या उद्भवली आहे.

From around the web