रेमीडीसीव्हर इंजेक्शन बाबत उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकांना महत्वाची सूचना

 
रेमीडीसीव्हर इंजेक्शन बाबत उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकांना महत्वाची सूचना

उस्मानाबाद -  उस्मानाबादसह  राज्यभर जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोरोनाचे जे रुग्ण अत्यवस्थ आहेत, त्याना रेमीडीसीव्हर इंजेक्शन गुणकारी ठरत आहे. मात्र  या रेमीडीसीव्हर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. त्याचाच गैरफायदा घेत काहीजण काळा  बाजार करीत आहेत. त्यासाठी आम्ही टिप्स देत आहत. 

- रेमीडीसीव्हर या इंजेक्शन ची मागणी खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परंतु, हे इंजेक्शन डाॅक्टरांनी जरी लिहून दिले तरी बाहेरच्या मेडिकल मध्ये कुठेही मिळणार नाही.

- जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या समितीमार्फत,  रुग्ण ज्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, फक्त त्या हाॅस्पिटललाच रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होईल असा सरकारचा आदेश आहे. नातेवाईकांना बाहेर मिळणार नाही.

- काळ्या बाजारतून तुम्ही औषधे घेत असाल तर फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- त्यामुळे नातेवाईकांनी आपला महत्वाचा वेळ खर्च न करता हाॅस्पिटल प्रशासनाकडेच वारंवार मागणी करावी.

ज्यांना इंजेक्शनची गरज आहे त्यांनी आधी खालील मुद्दे लक्षात घेऊन डाॅक्टरांशी चर्चा करावी.

१) डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन दिल्यावर त्यांना सांगा की, "हे इंजेक्शन हॉस्पिटलनेच मागवायचे आहे. तुम्ही आमच्या पेशन्टसाठी हे  इंजेक्शन गरजेचे आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांना कळवले आहे का?"

२) "जिल्हाधिकारी कोविड वाॅर रुम "ला कळविले असल्यास आमच्या पेशन्टचा इंजेक्शनसाठी चा वेटिंग नंबर काय आहे?"

३) डाॅक्टरांनी तरीही बाहेरून उपलब्ध करून देण्याचा आग्रह धरल्यास डाॅक्टरांकडून "सदर इंजेक्शन आमच्या हाॅस्पिटलमध्ये उपलब्ध नसल्यामुळे पेशंटच्या नातेवाईकांना बाहेरून आणावे लागेल" असे प्रिस्क्रिप्शन लेटरवर लिहून घ्यावे. तोंडी सूचना घेऊ नये.

४) आपल्या जिल्ह्यातील कोव्हिड वॉर रूम ला संपर्क करा.

सरकारच्या आदेशानुसार प्रत्येक पेशन्ट ला इंजेक्शन हॉस्पिटलमध्येच उपलब्ध होणार आहे, याची नोंद घ्या.

बाहेर कोणत्याही मेडीकलमध्ये ते मिळत नाही.

From around the web