किलज गावात अवैध दारुविक्री, शिंदी विक्री जोरात 

नळदुर्ग पोलिसांच्या आशीर्वादामुळे अनेक गावात अवैध धंदे राजरोस सुरु
 
d
किलज गावातील महिला अवैध धंद्याविरुद्ध आंदोलन करणार 

नळदुर्ग - नळदुर्ग पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या किलज गावात पोलिसांच्या आशीर्वादामुळे अवैध धंदे राजरोस सुरु आहेत. एकीकडे पोलिसांचे खिसे गरम होत असताना गोरगरिबांचे संसार उद्धवस्त होत आहेत. गावातील अवैध धंदे बंद करावे, या मागणीसाठी महिला एकवटल्या असून, त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

नळदुर्ग पोलीस स्टेशनला सपोनि म्हणून राऊत जॉईन झाल्यापासून अवैध धंदे मोठ्या प्रमाणात फोफावले आहेत. नळदुर्ग पासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या पाटील तांड्यावर लाखो लिटर  गावठी दारू गाळप होत असताना, पोलीस बघ्याची भूमिका घेत आहेत. तसेच विविध गावात  अवैध दारू विक्री सुरु आहे. मटका जोरात सुरु आहे. पोलिसांना दरमहा हप्ता ठरल्याने 'तेरी भी चूप , मेरी भी चूप' असा कारभार सुरु आहे. 


किलज मध्ये महिला एकवटल्या 

किलज गावात अवैध दारुविक्री, शिंदी विक्री  राजरोस सुरु आहे.  येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर शनिवारी  रोजी यासंदर्भात गावातील सर्व उमेद गट आणि ग्रामपंचायत यांची बैठक घेण्यात आली. यावेळी उपस्थित महिलांनी गावात बोकाळलेल्या अवैध दारुविक्री, शिंदी विक्री मुळे संसार कसे उध्वस्त होत आहेत आणि तरुण पिढी सुध्द यामुळे कशाप्रकारे लयास जात आहे. याची चर्चा करण्यात आली. तसेच यापुढे गावात कोठेही कोणीही अवैध दारु विक्री करु नये  अन्यथा  कायदेशीर कारवाईबाबत आक्रमक भुमिका घेण्याचा निर्णय घेण्यात आला. 


  अवैध दारुविक्री विरोधी घेण्यात आलेल्या बैठकीस महिला सरपंच आणि महिला उपसरपंच यांची माञ अनुपस्थिती होती. 'गावातील वाढते अवैध धंदे ही कित्येकांचे संसार उघड्यावर पाडणारी समस्या बनली आहे. यात उध्वस्थ होते ती प्रथमत:  स्ञी' ही जाणीव ठेवून सरपंच व उपरसपंच  बैठकीस उपस्थित राहणे जबाबदारीचे होते. परंतू तसे न झाल्याने  उपस्थित महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

  यावेळी पोलीस पाटील सुनिता मर्डे, श्री. स्वामी समर्थ उमेद ग्रामसंघाच्या सी. आर.पी. जगदेवी शेळके, परवीन जमादार, रमाबाई गायकवाड, प्रियंका  शिंदे, सुनिता पांचाळ, निता गवळी, जोत्स्ना ढाले, इंदुबाई ढाले, बायडाबाई गवळी, फुलाबाई गवळी आदी महिला तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

From around the web