कोरोनापासून दूर रहायचे असेल तर करून पहा हे घरगुती उपाय

 
 कोरोनापासून दूर रहायचे असेल तर करून पहा हे घरगुती उपाय




कोरोना व्हायरसच्या परिणामापासून बचाव करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे कोरोनाला टाळणे किंवा कोरोना होण्यापासून हरतऱ्हेने स्वत:चे संरक्षण करणे. त्यासाठी नियमित हात धुण्याची सवय बाळगा आणि  सतत स्वच्छता राखून काळजी घ्या. या व्यतिरिक्त, इम्यून पॉवर म्हणजेच प्रतिकार शक्ती मजबूत करा आणि वाढवा. त्यासाठी काही घरगुती उपचार प्रभावी ठरु शकतात. आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत की ज्या टिप्स अत्यंत फायदेशीर ठरतील.






  • काळ्या मिरीचा चहा पिणे हे रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी फायदेशीर ठरते. कारण त्यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडेंट्स आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात. म्हणूनच सकाळी आणि संध्याकाळी आपण हा चहा पिऊ शकता.


  •  तुळशीचा रस घेतल्याने कोरोना होण्यापासून रोखता येते. त्यामध्ये असलेली एंटीबॅक्टेरियल घटक कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत करतील.


  •  सर्दी आणि खोकला झाला असल्यास कोरोना व्हायरस होण्याचा धोका अधिक प्रमाणात असतो. म्हणून, दररोज एक चमचा आल्याचा रस प्यायल्याने संक्रमण होण्याची शक्यता कमी होईल.


  • शरीरातील विषारी द्रव्ये काढून टाकण्यास गरम पाणी पिण्यानेही फायदा होऊ शकतो. हवे असल्यास आपण त्यात दालचिनी आणि साखर मिसळूनही पिऊ शकता.




  •  सार्वजनिक ठिकाणी गेले तर संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. म्हणून बाहेर जाण्यापूर्वी मोहरी किंवा तिळाच्या गरम तेलाचा एक थेंब नाकात टाका. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल.


  •  व्हायरसचा प्रभाव आपल्यावर न पडण्यासाठी रुमाल किंवा छोट्या कपड्यात कापूर, वेलची ठेवा आणि वेळोवेळी त्याचा वास घेत रहा.


  • संसर्ग टाळण्यासाठी शरीर निरोगी,निकोप राहणे खूपच महत्वाचे असते. म्हणूनच पचायला हलके अन्न खा. हे चयापचय संस्था (metabolism) क्रियाशील करेल.


  • आपल्या अन्नात व्हिटॅमिन सी चा अधिकाधिक समावेश करा. हे शरीरातील विषाणूंविरूद्ध लढण्यास मदत करेल.यासाठी लिंबू, संतरी,मोसंबी आणि हंगामी फळे खात जा.

Osmanabad Live 1 Sat, Mar 28, 6:47 PM (4 days ago) to me


  • लवंगा आणि ब्राह्मी वनस्पतीचे सेवन करा . या दोहोंमध्ये एंटी बैक्टेरियल तत्वे असतात जी संसर्ग रोखण्यात मदत करतात.


  •  हिरव्या कोशिंबीरींना आपल्या रोजच्या जेवणाचा एक भाग बनवा. त्या चयापचय सुधारायला मदत करतात ज्यामुळे शरीर स्वस्थ रहाते.

From around the web