उस्मानाबाद पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांचा गृहमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

 
उस्मानाबाद पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांचा गृहमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

उस्मानाबाद - मर्सिडीज बेंझ कंपनी यांच्या विद्यमाने मुंबई येथे दि. 13.12.2020 रोजी ऑटो क्लासिक रॅली चे आयोजन करण्यात आले होते. कोविड- 19 संसर्ग व लॉकडाऊन काळात उल्लेखनिय कार्य केलेल्या महिला पोलीस अधिकारी- अंमलदार यांचा सत्कार यावेळीअनिल देशमुख, गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते करण्यात आला. 

उस्मानाबाद पोलीस दलातील महिलांविषयक करण्यात आलेल्या ‘भरोसा सेलच्या’ प्रभारी अधिकारी पोउपनि- श्रीमती प्रिती अशोक सावंत व नागरी हक्क संरक्षण शाखा येथील पोलीस नाईक- श्रीमती मिनाक्षी शिवाजी माळी यांनी कोविड- 19 संसर्ग व लॉकडाऊन काळात भरीव कामगिरी केल्याबद्दल  गृहमंत्र्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देउन त्यांचा सत्कार करण्यात आला.  

From around the web