रेमडेसीवीर आणि औषधी कोरोना रुग्णांना देण्याबाबत रुग्णांलयांना मार्गदर्शन सूचना

 
रेमडेसीवीर आणि औषधी कोरोना रुग्णांना देण्याबाबत रुग्णांलयांना मार्गदर्शन सूचना

 उस्मानाबाद -सद्यस्थितीत संपूर्ण जगात कोविडच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात व उस्मानाबाद जिल्ह्यातही कोविड बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.कोविडच्या मध्यम व तीव्र संसर्ग झालेल्या रुग्णांना नवीन विषाणूरोधक औषधे वापरण्याबाबत शासनाने दि. 22 जुलै-2020 रोजीच्या प्रमाणित उपचार पद्धतीमध्ये इंजेक्शन रेमडेसीवीर, टॉसिलीझूमॅब व फविपिरावीर गोळ्यांचा समावेश केला आहे. सद्यस्थितीत या औषधांचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने, जिल्ह्यासाठी उपलब्ध असलेल्या किंवा खरेदीद्वारे प्राप्त झालेला या इंजेक्शन व गोळ्यांच्या साठ्याचा वापर अतिशय काळजीपूर्वक व योग्य रुग्णांसाठी व्हावा म्हणून जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी मार्गदर्शन सूचना केल्या आहेत.

       प्रथम या औषधी,इंजेक्शनचा साठा जिल्हा रुग्णालय औषध भांडारात पुरेसा असल्याबाबत खात्री करुन घ्यावी. कोविड बाधित रुग्ण ज्या रुग्णालयात आहे, आणि त्यास यापैकी एक औषध,इंजेक्शन देण्याची गरज असल्याची खात्री आहे, त्या रुग्णालयाच्या प्रमुखांनी,उपचार देणा-या भिषकाने (Physician), जिल्हा रुग्णालयातील फिजिशियन डॉ. मुल्ला, यांच्याशी संपर्क साधून रुग्णाची स्थिती व अहवाल कळवावा.डॉ. मुल्ला  यांन उपलब्ध ड्युटीवरील फिजिशियन यांनी इतर रुग्णालयातील कोविड बाधित रुग्णांसंबंधी सर्व उपयुक्त माहितीची पडताळणी करुन, इंजेक्शन,औषध देण्यास रुग्ण योग्य आहे,अशी शिफारस मागणीपत्रावर नोंदवावी.

       रुग्ण जर MPJAY अंगीकृत रुग्णालयात भरती असेल तर ही औषधी,इंजेक्शन मोफत दिले जातील.त्या रुग्णालयांनी त्याबाबत रुग्णाकडून कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारु नये.जर रुग्ण खाजगी Non MPJAY रुग्णालयात भरती असेल तर रुग्णालयाने उसनवारी तत्त्वावर इंजेक्शन,औषधींची मागणी करावी. संबंधित रुग्णालयाने शासनाद्वारे निश्चित दराप्रमाणेच रुग्णाकडून शुल्क घ्यावे व तीन दिवसात इंजेक्शन,औषधे घेतलेल्या संख्येइतकीच परत देणे आवश्यक राहील.सर्व रुग्णालयांनी या औषधे,इंजेक्शनचा केलेला वापर, संख्या इ.माहिती विहित नमुन्यात जिल्हा रुग्णालयास सात दिवसात सादर करणे बंधनकारक आहे.

 विनावापर,राहिलेला औषधसाठा तात्काळ जिल्हा रुग्णालयास परत करणे आवश्यक आहे.उस्मानाबाद जिल्ह्यातील औषधीही  कोणत्याही औषधी दुकानदाराने सरकारी,खाजगी रुग्णालयाचे लेखी prescription असल्याशिवाय रेमडेसिविर औषधाची विक्री करु नये. रेमडेसिविर औषध विकत घेतलेल्या व्यक्तीचे नाव, रुग्णाचे नाव, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक यांची दररोज नोंद ठेवून सहाय्यक आयुक्त औषध प्रशासन यांना सादर करावी.शासनाद्वारे सर्व औषधे,इंजेक्शन यांचा दर (Inj Remdesivir 100 mg 665 रुपये 84 पैसे (सहाशे पासष्ट रु.चौ-याऐंशी पैसे) (Tab Favipiravir 200 mg/34 6 रुपये 72 पैसे (सहा रु.बाहत्तर पैसे) याप्रमाणे आहे.औषधी दुकानदारांनी त्यांच्याकडे विक्रीसाठी उपलब्ध रेमडेसिविरची संख्या दैनंदिन स्वरुपात सहाय्यक आयुक्त औषध प्रशासन यांना सादर करावी.खाजगी रुग्णालयांनी नवीन कोविड उपचार प्रोटोकॉल प्रमाणेच रेमडेसिविर इंजेक्शन रुग्णांना द्यावे.अनावश्यक वापर टाळावा,असेही या आदेशात म्हटले आहे.

From around the web