गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यात शासनाकडून मंजूरी

 
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यात शासनाकडून मंजूरी

 उस्मानाबाद - गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना 2021-2022  मध्ये राबविण्यास शासनाकडून मंजुरी मिळाली आहे.  शेती व्यवसाय करताना होणारे अपघात ,वीज पडणे,पुर,सर्पदंश,विंचु दंश,विजेचा धक्का बसणे इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात,रस्त्यावरील अपघात , वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू होतो किंवा काहीना अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तीस तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यास झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होवून अडचणीची परिस्थिती निर्माण होते. 

अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यास,त्याच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरीता सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व शेतकऱ्यांच्या कुटुंबातील वहीतीधारक खातेदार शेतकरी व शेतकऱ्यांच्या कुटुंबातील वहीतीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले कोणताही एक सदस्य  ( आई-वडील,शेतकऱ्याची पती ,पत्नी,मुलगा व अविवाहीत मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती )   असे 10 ते 75 वयोगटातील एकूण दोन जणांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यास शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे.

      योजनेचा कालावधी दि.07 एप्रिल-2021 ते 06 एप्रिल 2022 विमा कंपनीचे नाव दि.युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी लि.पुणे.पत्ता :- युनिट नं 601-602, 6 वा मजला, रिलायबल टेक पार्क क्लाउड सिटी कॅम्पस, ठाणे-बेलापुर रोड, ऐरोली नवी मुंबई - 400 708,दूरध्वनी क्रमांक. 022-41690888 मोबाईल नं – 9321962977,टोल फ्री क्रमांक - 1800 22 4030 1800 200 4030 ई-मेल आयडी - vaibhav.shirsat@universalsompo.com, yogendra.mohite@universalsompo.com

विमा सल्लागार कंपनी- मे.ऑक्झिलियम इन्शुरन्स ब्रोकर्स प्रा.लि पत्ता :- प्लॉट नं 61/4 सेक्टर-28 प्लाझा हटच्या पाठीमागे वाशी ,नवी मुंबई - 400 703 दूरध्वनी क्रमांक - 022-27650096 टोल फ्री क्रमांक - 1800 220 812ई-मेल आयडी - gmsavy21@auxilliuminsurance.com


 

From around the web