होमगार्डच्या प्रमुख ११ मागणीचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी निवेदन सादर 

 
होमगार्डच्या प्रमुख ११ मागणीचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी निवेदन सादर

उस्मानाबाद - राज्यातील होमगार्डच्या  प्रमुख ११ मागणीचे निवेदन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देण्यात आले. राज्यपाल  होमगार्ड समस्याबाबत सकारात्मक असल्याचे रामलिंग पुराणे यांनी सांगितले. 


मुरूम ( ता.उमरगा जि.उस्मानाबाद )  येथील समाजसेवक तथा बसव प्रतिष्ठाण अध्यक्ष रामलिंग पुराणे यांनी.राज्यपाल  भगतसिंह कोश्यारी यांची महाराष्ट्र राज्यातील होमगार्ड समस्यांबाबत दि.१५ डिसेंबर २०२० रोजी ई-मेल वर कळवून त्यावर चर्चा करण्यासाठी बैठकीसाठी वेळ मागितली होती त्यानुसार ५ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११.३० वाजता समाजसेवक रामलिंग पुराणे यांनी भेट घेऊन ५६ पानांचा सविस्तर प्रस्ताव सादर केले.यावेळी मुकुंद पांचाळ,उदय पाटील,नामदेव खानझोडे, दीपक कांबळे आदी उपस्थित होते.

या आहेत मागण्या 


1) विविध कारणांनी अपात्र होमगार्डना त्वरित विनाअट कामावर रुजू करून घ्यावे, 
2) कायमस्वरूपी 365 दिवस कामावर घ्यावे/किंवा आदींच्या सरकारने देऊ केलेले 180 दिवस काम पूर्वरत करणे
3) बंदोबस्त मानधन आठवडाभरात द्यावे, 
4)पोलीस खात्यातील 5 टक्के  आरक्षणावरून 15 टक्के करावे. 
5) तीन वर्षांनी होणारी पुर्ननोंदणी /पुनर्नियुक्ती पध्द्त बंद करावे, 
6) जिल्हा समादेशक/मानसेवी पद पूर्वरत ठेवावे,आंदोलकावरील झालेली कार्यवाही त्वरित मागे घ्यावे 
7) विविध कारणांनी कामावरून काढून  टाकण्यात आलेल्या समादेशक/इतर अधिकाऱ्यांना परत नियुक्ती द्यावे.
8) पोलीस प्रशासनास जी आपत्तीजनक विमा रक्कम मंजूर आहे त्यात होमगार्डचा ही समावेश करावा.
9) ३० जुलै २००९ च्या शासन निर्णयात बदल करून २ लक्ष रुपये विमा ऐवजी २०२० च्या चालू महागाई नुसार २० लक्ष रुपये करावे व तसेच परिवाराला लघु उद्योगसाठी तात्काळ देण्यात येणारे १० हजार रुपये ऐवजी १ लाख रुपये देण्यात यावे व त्यांच्या पाल्याचा शिक्षण खर्चही वाढवून द्यावे.
10) प्रशिक्षण घेऊनही अद्याप त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले नाहीत, त्यांना पोलीस भरतीत आरक्षण नुसार समाविष्ट करून घ्यावे.
11) महासमादेशक यांनी नेमलेली तीन सदस्यीय समिती रद्द करून नवीन समिती नेमणे
 

From around the web