महाविकास आघाडी सरकारला शेतकऱ्यांना मदत करण्याची बुद्धी दे - आ. पवार

 
S

तुळजापूर -  श्री तुळजाभवानी मातेच्या दारी आलो आहे आई, तू म्हणशील मंत्री आहेत, पालकमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत मग आम्ही तुझ्या दारी का आलो आहोत ? आई, तहसीलदार, जिल्हाधिकारी, मंत्री, पालकमंत्री, मुख्यमंत्री अशा सगळ्यांना निवेदनं देऊन झाली पण ते ढुंकूनही पाहायला तयार नाहीत. म्हणून तुलाच साकडं घालत आहोत. मराठवाड्यातील शेतकऱ्यांची व्यथा समजून घेण्याची संवेदनशीलता, २०१९ प्रमाणे नुकसानभरपाई देण्याची सदबद्धी आणि विमा कंपन्यांवर कारवाई करण्याचे धैर्य सरकारला दे हेच तुझ्या चरणी साकडं घातले असल्याचे भाजपचे आ. अभिमन्यू पवार यांनी तुळजापूर येथे दि.१८ ऑक्टोंबर रोजी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.  

यावेळी जिल्हाध्यक नितीन काळे, अनिल काळे, संतोष बोबडे, संताजीराव चालुक्य, देविदास काळे, नारायण नन्नवरे, गुलचंद व्यवहारे, आनंद कंदले, नरसिंग बोधले,  सुभाषराव जाधव, काकासाहेब मोरे, सुनील उडगे, सागर कदम, सागर पारडे, सुहास साळुंके आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना आ. पवार म्हणाले की, आई, तू जाणतेसच की अतिवृष्टीने मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हाती आलेल्या सोयाबीनकडून शेतकऱ्यांच्या किती अपेक्षा होत्या, किती स्वप्न होती. कोणाला लेकीचे लग्न करायचे होते तर कोणाला लेकरांचे उच्च शिक्षण. कोणाला आई/वडिलांचं ऑपरेशन करायचं होत तर कोणाला दिवाळीला घराबाराला नवे कपडे घ्यायचे होते.

शेतकऱ्यांचे खपू काही मागणं नाही आई, २०१९ मध्ये कोल्हापूर-सागलीत पूर आल्यानंतर तत्कालीन सरकारनं ज्या निकषांप्रमाणे नकसान भरपाई दिली होती. त्या प्रमाणे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी. मागच्या वर्षी पीक विमा मिळाला नाही. यावर्षी तर पुन्हा नुकसान झाल्यानंतर नियमाप्रमाणे २५ टक्के आगाऊ विमा द्यावा. सरकार कागदोपत्री आदेश काढत असून कंपन्या त्या आदेशांना केराची टोपली दाखवतात. विमा कंपन्या सरकारला जुमानत नाहीत कारण सरकारला शेतकऱ्यांना विमा मिळवून देण्यापेक्षा विमा कंपनीच्या नफ्यात हिस्सेदारी मिळवण्यात अधिक रस आहे असा आरोप केला.  आ. राणाजगजितसिंह पाटील व आ. अभिमन्यू पवार आमदार, या दोघानी मिळून देविला साकडे घालून निवेदन दिले.

D

 आ. पवार यांची औसा ते तुळजापूर पदयात्रा शहरामध्ये दुपारी १२ वा. दाखल झाली. त्यावेळी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, भाजपा जिल्हा अध्यक्ष नितीन काळे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, आनंद कंदले, भाजपाचे जिल्हा चिटणीस गुलचंद व्यवहरे, नगरसेवक विशाल रोचकरी, औदुंबर कदम, नारायण नन्नवरे, भाजपा तालुकाअध्यक्ष संतोष बोबडे आदी उपस्थित होते.

From around the web