येरमाळ्याच्या सरपंचपदी प्रथमच मुस्लिम महिलेची निवड

सरपंचपदी भाजपच्या तबस्सुम सय्यद तर उपसरपंचपदी  गणेश बारकुल यांची निवड 
 
येरमाळ्याच्या सरपंचपदी प्रथमच मुस्लिम महिलेची निवड

येरमाळा -  येरमाळा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपच्या तबस्सुम रफिक सय्यद तर उपसरपंचपदी भाजपचेच  गणेश बाबा बारकुल यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. येरमाळ्याच्या सरपंचपदी प्रथमच मुस्लिम महिलेची निवड झाली आहे. 


येरमाळा ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत आ. राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सर्वच्या सर्व जागा निवडून आल्या होत्या. पॅनलचे नेतृत्व विकास बारकूल यांनी केले होते. राष्ट्रवादीचे सुहास बारकूल यांच्या पॅनलचा धुव्वा करून भाजपने घवघवीत यश मिळवले होते. 

 
 सरपंचपदी तबस्सुम रफिक सय्यद तर उपसरपंचपदी  गणेश बाबा बारकुल यांची निवड होताच त्यांचे पुष्पहार घालून अभिनंदन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमामध्ये  पॅनल प्रमुख विकास बारकुल,भाऊसाहेब बारकुल , निशिकांत गायकवाड ,विजय देशमुख, हाजी सय्यद सत्तार व माजी सरपंच मुर्हरी कांबळे  जिल्हा परिषद सदस्य तात्या बारकुल आदी उपस्थित होते. 

From around the web