'महाआवास अभियान” मध्ये उस्मानाबाद जिल्हा मराठवाड्यात प्रथम

 
'महाआवास अभियान” मध्ये उस्मानाबाद जिल्हा मराठवाड्यात प्रथम

  उस्मानाबाद,- महाराष्ट्र शासनाने महाआवास अभियान अंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यास दिलेल्या उद्दिष्ट पूर्तीमध्ये उस्मानाबाद जिल्हा मराठवाड्यात प्रथम असल्याची बाब विचारात घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनिलकुमार नवाळे व त्यांच्या चमूचे अभिनंदन केले.

          महाराष्ट्र शासनाद्वारे राबविण्यात येत असलेल्या महाआवास अभियान ग्रामीण अंतर्गत राज्य पुरस्कृत विविध आवास योजनांकरिता उस्मानाबाद जिल्ह्यास १५२५१ घराचे उद्दिष्ट पूर्ण करावयाचे होते.रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना अशा विविध योजने अंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांचा वारंवार पाठपुरावा करून प्रकल्प संचालक श्री अनिलकुमार नवाळे तसेच जिल्हा स्तरावर व तालुका स्तरावरील काम करणारे सहाय्यक प्रकल्प अधिकारी,विस्तार अधिकारी,जिल्हा प्रोग्रामर,कार्यासन,डाटा एन्ट्री ऑपरेटर यांनी पूर्ण करण्यात महत्वाची भूमिका बजावली. 

तालुकास्तरावरील सर्व गटविकास अधिकारी मार्फत होत असलेल्या या अभियानाच्या कामकाजाचा आढावा मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अध्यक्ष कार्यकारी समिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा तसेच प्रकल्प संचालक यांनी तालुकास्तरीय बैठका घेतल्या होत्या. तसेच सर्व संबधित अधिकारी कर्मचारी यांनी याकामी व्यक्तिगत लक्ष दिल्याने १५२५१ पैकी १५०११ एवढे उद्दिष्ट पूर्ण करण्यास जिल्हा परिषद उस्मानाबाद ला यश मिळाले आहे. उर्वरित २४० हे उद्दिष्ट लवकरच पूर्ण करण्याच्या अनुषंगाने योग्य ते नियोजन करण्यात आले आहे.

          याकामी अशोक काळे, संतोष चप्पलवार,मेघराज पवार,राम पवार,रविंद्र इरकल,महेश मगर यांनी सुट्टीच्या दिवशी व रात्री उशिरापर्यंत बसून अपेक्षेपेक्षाही जास्त काम केल्याने श्री.फड यांनी त्यांचे व्यक्तीशः कौतुक केले आहे. यापुढे प्राप्त होणाऱ्या उद्दिष्ट पूर्तीचे योग्य ते नियोजन चालु आहे.  

                         

From around the web