पीक कर्ज तीन लाखापर्यंत मंजूर करण्याचे अधिकार भारतीय स्टेट बँकेच्या सर्व शाखा व्यवस्थापकास द्या... 

खासदार ओमराजे यांची केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्याकडे मागणी 
 
s

नवी दिल्ली  - भारतीय स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापकास तीन लाखापर्यंत पीक कर्ज मंजूर करण्याचे अधिकार देण्यात यावे तसेच  बँकेतील रिक्त पदे भरण्यात यावीत, अशी मागणी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत  कराड साहेब यांच्याकडे  मंत्रालय दालनात भेट घेऊन केली. 

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ क्षेत्रात तसेच महाराष्ट्र राज्यात भारतीय स्टेट बँकेच्या अनेक शाखा ग्राहकांच्या सेवेत प्रामाणिकपणे कार्यरत आहेत. परंतु आरएसीसीकडे जिल्ह्यातील विविध शाखांमधील कर्जाच्या संदर्भात कर्जाची प्रकरणे प्रस्तावित आहेत, ज्यामुळे पीक कर्जाची कामे करण्यास 6 ते 12 महिने लागतात, त्यामुळे शेतकरी व बँक कर्मचार्‍यांना बरेच दिवस प्रक्रिया आणि मंजुरी होईपर्यंत थांबावे लागते. 

या सर्व बँकांच्या शाखा व्यवस्थापकास पीक कर्ज वितरण करण्यास परवानगी नसल्याने व बँकेतील कर्मचारी रिक्त पदे असल्याने पीक कर्ज वाटपास बरेच दिवस विलंब लागत आहे, असे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी डॉ. कराड यांना  दिलेल्या पत्रात म्हटले आहे. 

sd



 

From around the web