तुळजाभवानी मंदिरात गैरवर्तन करणाऱ्या आठ पुजाऱ्यांना तीन महिने मंदिर प्रवेश बंद 

 
तुळजाभवानी मंदिरात गैरवर्तन करणाऱ्या आठ पुजाऱ्यांना तीन महिने मंदिर प्रवेश बंद

तुळजापूर - महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात गैरवर्तन करणाऱ्या आठ पुजाऱ्यांना  तीन महिने मंदिर प्रवेश बंद करण्यात आला आहे तर सोळा पुजाऱ्याना  6 महिनेसाठी मंदिर प्रवेश बंदी का करू नये, याची कारणे दाखवा नोटीस  बजवण्यात आली आहे. 


कोरोना नियमांचे उल्लंघन व गैरवर्तन केल्याने देऊळ ए कवायत कायदानुसार कारवाई करण्यात आली असून जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या आदेशाने तहसीलदार सौदागर तांदळे यांनी ही प्रवेशबंदीची कारवाई केली आहे. 

पुजारी अभिजीत कुतवळ, कुलदीप औटी, पंकज कदम, संपत गंगणे, संदीप टोले, लखन भोसले, ओंकार भिसे व आकाश परदेशी या 8 पुजाऱ्यांना 3 महिने मंदिर प्रवेश बंदी केली असून 6 महिने मंदिर प्रवेश बंदी का वाढवू नये, अशी नोटीस बजावली आहे.
 

From around the web