संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर मांडणार आठ प्रश्न 

 
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर मांडणार आठ प्रश्न

मुंबई - संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाकडे राज्याचे प्रलंबित असलेल्या प्रस्तावांबाबत चर्चा करण्यासाठी सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांची बैठक झाली.या  बैठकीस  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, उद्योग मंत्री सुभाष देसाई, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, मुख्य सचिव संजय कुमार आदी यावेळी उपस्थित होते. 

या बैठकीस उस्मानाबादचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर  उपस्थित राहून चर्चेत सहभाग घेतला.धाराशिव (उस्मानाबाद) लोकसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनीधी म्हणून शेतकऱ्यांच्या निगडीत अडचणी व इतर महत्वाचे खालील मुद्दे संसदेच्या केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

खा. ओमराजे मांडणार हे आठ प्रश्न 


 1) उस्मानाबाद - तुळजापूर - सोलापूर रेल्वेमार्ग पूर्ण करणे.
 2) प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील जाचक अटी रद्द करणे.
3) नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत मिळणेसाठी आवश्यक असणारी अल्पभूधारक ही अट रद्द करणे.
4) लातूर - बार्शी - टेंभूर्णी हा रस्ता चौपदरीकरण करणे.
5) उस्मानाबाद तसेच महाराष्ट्रातील अतिवृष्टी झालेल्या जिल्हयातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारची आर्थिक मदत मिळणे.
6) नारीवाडी ता.बार्शी जि.सोलापूर ते बोरफळ ता.औसा जि.लातूर हा रस्ता केंद्रीय बजटमधून करणे. 
7) बार्शी - तुळजापूर हा रस्ता केंद्रीय बजटमधून करणे.
8) धाराशिव येथील पूर्वीचे पोस्ट ऑफीस मुख्यालय लातूर येथून उस्मानाबाद येथे स्थलांतरीत करणे.

From around the web