बर्ड फ्लू बाबत सतर्कता बाळगण्याचे जिल्हाधिकारी दिवेगावकर यांचे आवाहन

 
बर्ड फ्लू बाबत सतर्कता बाळगण्याचे जिल्हाधिकारी दिवेगावकर यांचे आवाहन

उस्मानाबाद -देशात मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, केरळ, राजस्थान, गुजरात या राज्यातील धरण परिसर आणि पाणथळ जागांच्या सभोवतालच्या परिसरमध्ये स्थलांतरीत पक्षी, बदल,कावळे बर्ड फ्लूमुळे मृत्यू झाला आहे.त्यामुळे जिल्हयातील जनतेने आणि पोल्टी फार्मच्या मालकांनी सतर्कता बाळगून पशुसंवर्धन विभागाशी संपर्क करावा,असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे.

        हरियाना राज्यात कुक्कुट पक्षांमध्ये बर्ड फ्लू रोगाचे निदान झाले आहे.सध्या राज्यात मुंबई, ठाणे, दापोली आणि बीड येथे कावळे, बगळे(इग्रेट्स) या पक्षांचे तसेच परभणी येथील पोल्ट्रीफार्ममधील 800 पक्षांचे आणि लातूर जिल्हयातील पोल्ट्रीफार्ममधील 400 पक्षाचा मृत्यू झाला आहे. त्याचे नमुने भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थान भोपाळ येथील प्रयोगशाळेकडे पुढील तपासणीसाठी पाठविले आहेत.   
        
          या अनुषंगाने वन विभाग तसेच पाटबंधारे आणि मृद व जलसंधारण विभागाच्या अखत्यारीमधील पाणीसाठा,तलाव व इतर ठिकाणी वन्य पक्षी किंवा स्थलांतरीत पक्षी यांच्यामध्ये असाधारण मृत्यू झाल्याचे आढळून आल्यास तसेच ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये पक्षांमध्ये असाधारण मृत्यू झाल्याचे आढळून आल्यास नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1/2 आणि तालुका लघुपशुसर्वचिकीत्सालय/जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकीत्सालय उस्मानाबाद या पशुवैद्यकीय संस्थेशी संपर्क साधावा.तसेच बर्ड र्फ्ल रोग प्रादुर्भावाच्या नियंत्रणाच्या अनुषंगाने केंद्र शासनाच्या बर्ड फ्लू प्रतिबंध नियंत्रण कृती आराखडा 2021 नुसार कार्यवाही करण्याबाबत सर्व संबंधितांना आपल्या स्तरावरुन सूचना दिल्या आहेत.त्या सूचनाचे पालन करावे असेही आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत
.
           बर्ड फ्ल्यू रोग प्रादुर्भाव व प्रसाराबाबत मार्गदर्शक सूचना अशा अचानक मोठया प्रमाणावर उदभवणारे पक्षांचे मृत्यू झाल्याची माहिती त्वरित वरिष्ठ कार्यालयास /आयुक्तालयास कळवावी.सर्व शेतकरी/पशुपालकांना बर्ड फल्यू रोगाची माहिती देवून अशा प्रकारची लक्षणे आढळल्यास नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधण्यास सांगावे.पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांनी रोजच्या /आठवडी बाजारात विशेष सर्वेक्षण मोहीम राबवावी.संशयीत क्षेत्रावरुन पक्षांची वाहतूक/ने-आण पूर्ण बंद करावी.

उघडया कत्तलखान्यात जैवसुरक्षा यंत्रणा सक्षम करावी.रोजची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करावे.अशा कत्तलखान्यातून पक्षी  परत येणार नाहीत.याची काळजी घ्यावी.आसेही आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

           या रोगाचे जंतू डुंकरांमध्ये किंवा डुकरांकडून संक्रमित होणार नाहीत.अशा प्रकारची जैवसुरक्षा यंत्रणा असणे अत्यावश्यक आहे.जिल्हा पातळीवर खबरदारीच्या उपायांची/जिल्हास्तरीय सतर्कतेबाबत वेळीच चाचपणी करणे.उदा.रोग प्रादुर्भावाच्या अनुषंगाने लागणारे साहित्य, उपकरणे, रसायने इ.बाबत शाश्वती बाळगणे आवश्यक साहित्य जसे पीपीई किटस्, मास्क, निर्जंतुके,रसायने इ.उपलब्धता करुन ठेवणे व अशा वस्तुंच्या उपलब्धतेसंबंधी आवश्यक बाबींची पुर्तता करुन ठेवणे,तसेच या वस्तु आवश्यक वेळी अविरतपणे कशा उपलब्ध होतील,या विषयीची माहिती कायमपणे ठेवण्यात यावी.2015 च्या सर्वेलन्स प्लॅननुसार व्यापक बर्ड फल्यू सर्वेक्षण मोहिम सुरु ठेवावी.या आजराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आवश्यक कार्यवाहीबाबत अधिकची माहिती (www.dahd.nic.in ) या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.आपल्या जिल्हयांमध्ये पोल्ट्री फार्मस् आहेत, तेथे आवश्यतेनुसार याबतची कार्यवाही करावी.फक्त शासकीय नव्हे तर खाजगी पोल्ट्री फार्मस्वरसुध्दा याबाबत खबरदारी घेणे आवश्यक आहे. बर्ड फल्यू सर्वेक्षणाबाबत रोग अन्वेषण विभाग,औंध,पुणे-67 यांच्या सतत संपर्कात रहावे,असेही आवाहन त्यांनी केले आहे.

       प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीने धुण्याचा सोडा (Na2Co3सोडीयम कार्बोनेट)यांचे एक लिटर पाण्यामध्ये सात ग्राम याप्रमाणे द्रावन युनायटेड स्टेट डिपार्टंमेंट ऑफ अँग्रीकल्चर (युएसडीए) या आंतरराष्ट्रीय संस्थेचे शिफारस केल्याप्रमाणे तयार करुन कोंबडयांची खुराडे,गुरांचे गोठे,गावातील गटारे,नाल्या,पशुपक्ष्यांचा  वावर असलेल्या भिंती व जमिनीवर तात्काळ फवारणी करावी.पुन्हा दर 15 दिवसाच्या अंतराने तीन वेळेस फवारणी करावी.यामुळे विषाणु,जिवाणु,माश्या,गोचिड,ऊवा इत्यादींचा प्रादुर्भाव रोकणे शक्य होईल.सर्वेक्षणासाठीचे रोगनमूने नियमितपणे प्रयोगशाळेस पाठवावेत.पाहुणे पक्षी (Migratory Birds) यांचा बर्ड फल्यू रोगाच्या प्रसारामध्ये महत्वाची भूमिका बजावत असल्याने ते ज्या भागात भेट देतात, त्या भागामध्ये व्यापक,नियमित व वारंवार सर्वेक्षण मोहिम राबवाव्यात.या रोगाबद्दल सर्वसामान्यांना माहिती व्हावी व पक्षांच्या संपर्कता असणारे यांना या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व प्रकारची माहिती उपलब्ध होण्याकरिता, माहिती प्रशिक्षण  व संपर्क शिबिरांचे आयोजन करण्यात यावे.जिल्हास्तरीय दक्षता पथकांची (आर.आर.टी.)स्थापना करावी व त्यांना आवश्यक प्रशिक्षण ही देण्यात यावी,असेही आदेश जिल्हाधिकारी श्री.दिवेगावकर यांनी दिले आहेत.

    पशुसंवर्धन विभाग,भारत सरकारकडून 2015 मध्ये शासकीय /खाजगी पोल्ट्री फार्मससाठी जैवसुरक्षेबाबत प्राप्त मार्गदर्शक सूचना आहेत.त्यांचे संबंधितांनी पालन करावे.त्या जिल्हयातील सर्व पोल्ट्री फार्मसनी पक्षांच्या आरोग्यासाठी मुलभूत स्वच्छता विषयक अटीचे पालन करणे गरजेचे आहे.यामधूनच स्वच्छ व आरोग्यदायी उत्पादने मिळू शकतात.रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वव्यापी जैवसुरक्षा कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे,रोगांचे सर्वेक्षण करणे,फार्मवरील नियमीत कामाचे मूल्यमापन करणे इ.आवश्यक आहे.बर्ड फल्यू सारखा रोगांच्या यापूर्वी झालेल्या प्रादुर्भावांपासून बोध घेऊन यापुढे अशा प्रकारच्या आपत्ती उद्भवणार नाही.याकरिता चोख जैवसुरक्षा प्लॅनची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.या मार्गदर्शक सूचनांमध्ये स्वच्छता,वाहतूक,मलमूत्र व्यवस्थापन,मृत पक्ष्यांची विल्हेवाट,खाद्य सुरक्षा,उपचार,लसीकरण,योग्य रोग नमूने गोळा करणे इत्यादी विषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे.

        क्षेत्रिय स्तरावरील अधिकाऱ्यांनी पोल्ट्री फार्मस्वर जैवसुरक्षा खात्री करण्याकरिता 2015 च्या निर्देशानुसार बर्ड फल्यू ॲक्शन प्लॅनच्या अशा प्रकारची प्रदुशन आणि जैववैद्यकीय कचरा नियम 1998 आणि प्राण्यातील जंतूचा प्रादुर्भाव आणि रोग नियंत्रण  संबंधी कायदा 2009 नुसार कार्यवाही करीत असल्याची खात्री बाळगावी.स्थलांतरीत पक्षी,वन्यपक्षी/कावळे इ.मध्ये मरतूक आढळल्यास फार्मवर त्यांचे शवविच्छेदन करु नये विभागीय/राज्यस्तरीय/जिल्हास्तरीय प्रयोगशाळेस त्वरीत सूचना द्याव्यात.अशा प्रयोगशाळांनी नियमाप्रमाणे निदानाकरिता नमूने गोळा करुन आवश्यकतेप्रमाणे तपासणे करावी.बर्ड फल्यू रोगासाठी संशयित नमूने HSADL प्रयोगशाळा,भोपाळ येथे रोग अन्वेषण विभाग,पुणे यांचे मार्फत पाठवावेत.अन्य आजारांसाठी नियमाप्रमाणे रोग निदानाची कार्यवाही करावी.संशयीत/प्रादुर्भाव झालेल्या फार्मवरुन पक्षांची वाहतूक,विक्री/खरेदी,खाद्य वाहतूक पूर्ण थांबवावी.फार्मस्वर जैव सुरक्षेबाबत सूचना चिन्हांचा प्रभावीपणे वापर करावा.

     पोल्ट्री फार्मवर जैवसुरक्षा उपायोजना करुन पक्षांना रोगांपासून आणि या रोगांचे मानवास होणाऱ्या संक्रमणापासून वाचवणे शक्य होईल.देशभरातील सर्व फार्मनी अशा प्रकारची कार्यवाही चोखपणे केल्यास निरोगी,सुरक्षीत व निकोप कुक्कुट पालन करणे साध्य होईल,असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

From around the web