कोरोना रुग्ण निरोगी झाल्यानंतरही विषाणू शरिरात जिवंत रहातो !
Mar 29, 2020, 17:37 IST
पेशंटचे होम क्वारंटाईन वाढवावे, डॉक्टरांचे म्हणणे !
जगभरात कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव सतत च वाढत आहे. कोरोनाने आत्तापर्यंत हजारो लोकांना आपल्या तावडीत घेत ले ले आहे. पण त्याचा आणखी इतरांना होणारा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संक्रमित लोकांना अलग ठेवण्यात येते. अगदी उपचारा दरम्यान बरेच लोक या धोकादायक कोरोनाच्या आजारापासून मुक्त देखील झाले आहेत , परंतु डॉक्टरांनी याबाबत नवा इशारा दिला आहे त्यांच्या मते, कोरोनाबाधित रुग्ण जरी निरोगी झाल्या तरीही नंतर त्याच्या शरिरात कोरोना विषाणू मरत नाही, परंतु तो तब्बल 8 दिवस जिवंत राहिलेला आढळतो.
अमेरिकेतील येल विद्यापीठात भारतीय वंशाचे वैज्ञानिक लोकेश शर्मा यांनी याबाबत एक खुलासा केला आहे. ते म्हणाले की, कोरोना विषाणूचे अर्धे रूग्ण , ज्यांना कोरोनाची सामान्य लक्षणे आहेत, त्यापैकी निम्मे रूग्ण बरे झाल्यानंतर ही त्यांच्या शरीरात आठ दिवसांपर्यंत कोरोना विषाणू जिवंत आढळला आहे . अमेरिकल जर्नल ऑफ रेस्पिरेटरी एंड क्रिटिकल या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनातही असाच दावा करण्यात आला आहे.
कोरोना विषाणू जिवंत असल्याने , त्याचा प्रसार होण्यापासून रोखणे अधिकच कठीण झाले आहे. वैज्ञानिकांनी 28 जानेवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान ज्यांचा उपचार केला गेला त्या कोरोनामुळे ग्रस्त अशा सोळा रुग्णांवर हे संशोधन केले. एका दिवसाच्या अंतराने सर्व रुग्णांच्या स्वॅब तपासणीचे नमुने घश्यातून घेण्यात आले होते.
रुग्णालयातून ज्यांच्या तपासणीचा नकारात्मक अहवाल आला त्या रुग्णांना नं त र घरी सोडण्यात आले होते परंतु अशा रुग्णांमध्येही बर्याच दिवसांपासून कोरोना विषाणू जिवंत असल्याचे दिसून आले. अशा परिस्थितीत व्हायरसची रुग्णामध्ये तीव्र लक्षणे दिसायला वेळ लागतो, त्याचसाठी डॉक्टरांनी रुग्णांना इतरांपासून अलग ठेवण्याचा कालावधी हा दोन आठवड्यांसाठी वाढविण्यास सांगितले आहे याचाच अर्थ असा की जरी कोरोना तपासणीचा नकारात्मक अहवाल आला तरी कोरोना विषाणू 8 दिवस शरीरात जिवंत रहात असतो हे निश्चित.