कोरोना :शहर सोडून गावाकडे जाणाऱ्याना उद्देशून मोदींनी केले ट्विट
Mar 21, 2020, 23:02 IST
मुंबई - देशात कोरोना व्हायरसचा विळखा वाढत चालला आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३०० पेक्षा अधिक झाली आहे, सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत, त्यातल्या त्यात पुणे, पिंपरी चिंचवड आणि मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सर्वात जास्त आहे. त्यामुळे या तिन्ही शहरातील लोक आपल्या मूळ गावी जात आहेत. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून शहर न सोडण्याचे आवाहन केले आहे.
मोदी यांनी ट्विट केले की, माझी सर्वात मोठी प्रार्थना आहे की आपण ज्या शहरात राहात आहात त्याच ठिकाणी कृपया काही दिवस तिथे राहा तरच आपण सर्वजण हा रोग पसरण्यापासून रोखू शकतो. आपण रेल्वे स्टेशन, बसस्थानमध्ये गर्दी करून आपल्या आरोग्याबरोबर खेळत आहोत. कृपया स्वतःबद्दल आणि आपल्या कुटुंबाची चिंता करा, जर आवश्यक नसेल तर आपले घर सोडू नका.
मेरी सबसे प्रार्थना है कि आप जिस शहर में हैं, कृपया कुछ दिन वहीं रहिए। इससे हम सब इस बीमारी को फैलने से रोक सकते हैं। रेलवे स्टेशनों, बस अड्डों पर भीड़ लगाकर हम अपनी सेहत के साथ खिलवाड़ कर रहे हैं। कृपया अपनी और अपने परिवार की चिंता करिए, आवश्यक न हो तो अपने घर से बाहर न निकलिए।— Narendra Modi (@narendramodi) March 21, 2020