80 वर्षांपूर्वीच शास्त्रज्ञाने सांगितले आयसोलेशनचे महत्त्व...
Apr 8, 2020, 20:13 IST
आज संपूर्ण जग नॉव्हेल कोराना विषाणू म्हणजेच कोविड 19 व्हायरस च्या प्रादुर्भावा मुळे फारच त्रासलेले आहे. सुपर पॉवर समजण्यात येणाऱ्या अमेरिकेनेही कोरोनासमोर सपशेल हार मानलेली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या आयसोलेशन होम क्वॉरंटाईन आणि आयसोलेशन केले जात आहे. मात्र 80 वर्षांपूर्वीच एका शास्त्रज्ञाने आयसोलेशनचे महत्त्व सांगितले आहे.
डॉ. जॉन डेवी यांनी हे पुस्तक डॉक्टर आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी लिहिले आहे. पुस्तकात एका पानावर त्यांनी लिहिलेले आहे की, जर संसर्ग झालेल्या कोणत्याही रूग्णांसाठी होम नर्सिंगची व्यवस्था केली गेली असेल तर खोलीत शक्य तितके कमी सामान असावे , खोली हवेशीर आणि घराच्या इतर सदस्यांच्या खोल्यांपासून दूर ठेवावी. रूग्णाची काळजी घेणाऱ्या लोकांनी साबणाने वारंवार आपले हात धुवायला हवेत, आंघोळ करताना शरीरावर साबण घासून अंघोळ करावी आणि शक्य तितक्या ताज्या हवेमध्ये रहाणे आवश्यक आहे. लोकांना हे समजले असेलच की, कोरोना विषाणूमुळे रूग्णांना अलग ठेवणे आणि अलिप्त राहणे भागच आहे.
आयसोलेशनचे महत्त्व
आपल्या पुस्तकात त्यांनी रूग्णाच्या विलगतेबाबतचे अनेक नियम आणि महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितल्या आहेत. रूग्णाची थुंकी , श्लेष्म, कपडे आणि त्यांनी वापरलेली भांडी नेहमीच स्वच्छ करा आणि ती स्वतंत्र ठेवा. शक्य तितक्या लवकर बायो व्हेस्ट वारावे कारण संसर्ग हा घराच्या इतर सदस्यांपर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता आहे. खोलीतून कार्पेट्स, भिंतीवरील आरोहित चित्रे आणि कॅलेंडर इ. सर्व काढून टाका, फर्निचर अशा खोलीत ठेवा जेथे ते सहज धुतले जाऊ शकते. डॉ. जॉन डेवीनी लिहिले की अत्यंत संसर्गजन्य रोगांमध्ये अलग रहाणे खूप महत्वाचे असते. 1940 मध्ये लिहिलेल्या त्यांच्या पुस्तकात दिलेला तपशील अगदी आज आठ दशकांनंतरही अजूनही खूप महत्वाचा आहे आणि रुग्णालयांमध्ये त्याचे काटेकोरपणे पालन केले जातेय. ते पुस्तकात लिहितात की, संक्रमित रूग्णाचे खोलीचे तापमान 50 ते 60 फॅरेनहाइट दरम्यान म्हणजेच 12 ते 15 डिग्री सेल्सिअस दरम्यान असावे.
कोण होते डॉ. जॉन डेवी
डॉ. जॉन डेवी हे दुसर्या महायुद्धाच्या काळात ब्रिटनमधील चेचक , टायफस आणि स्कार्लेट अशा तापासारख्या संसर्गजन्य रोगांकरिता उपचार करणारे अग्रगण्य वैद्यकीय अधिकारी होते. 1930 च्या दशकात डॉ . जॉन डेवी हे लंडनमधील वेस्टर्न हॉस्पिटलमध्ये महत्त्वाचे वैद्यकीय अधीक्षक होते. एक महामारी रोग तज्ञ म्हणून डॉ जॉन डेवी यांनी चेचक सारख्या प्राणघातक संसर्गजन्य रोगांचा विशेष अभ्यास केला.
1870-74 दरम्यान डॉ. जॉन डेवी यांनी चेचक या साथीच्या रोगावेळी लोकांवर उपचार केले जेव्हा या साथीच्या रोगामुळेच फ्रान्स-रशिया युद्धादरम्यान 20 ,000 हून अधिक सैनिकांनी प्राण गमावले होते. आंघोळीच्या पाण्यामध्ये कॉर्बोलिक एसिड टाकल्यास किंवा शरीराला अशा पाण्याने पुसून घेतल्यास संसर्ग होणाऱ्या विषाणूंचा नाश होतो असेही त्यानी म्हटले होते.