कोरोना : मराठवाड्यात सर्वात जास्त मृत्यू दर उस्मानाबाद जिल्ह्यात

· उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. मराठवाड्यात सर्वात जास्त मृत्यु दर उस्मानाबाद जिल्हयात आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कोविड-१९ बाधित रुग्णांचा दुर्दैवी व उच्चांकी मृत्यू दर लक्षात घेता तातडीने, जाणीवपूर्वक व नियोजनबद्ध उपाययोजना करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जिल्ह्यात बैठक घेण्याची मागणी आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.
- आजमितीला एकूण बाधित रुग्णसंख्या ४५,४३१ झाली असून उपचाराधीन रुग्णांची संख्या ७,२७७ आहे. कालपर्यंत जिल्ह्यात १,०७७ कोरोनाबाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे.
- जिल्हा रुग्णालयातून देण्यात आलेल्या माहितीप्रमाणे जिल्हाभरात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,४३,३४७ प्रयोगशाळा नमुन्यापैकी ४४,६९८ (३४.४८%) नमुने पॉजिटिव्ह आले आहेत. काल प्रयोगशाळेतून प्राप्त झालेल्या RT-PCR चाचणीच्या ६२१ ग्राह्य अहवालामधील ३११ नमुने ( ५०%) पॉजिटिव्ह आले तर रॅपिड अॅटीजेन टेस्ट अंतर्गत १,५२६ पैकी ४०१ नमुने (२६ %) पॉजिटिव्ह आले, असे काल एका दिवसात ७१२ नवीन रुग्ण सापडले आहेत.
- १६ लाख लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यात दिवसाला केवळ २ ते ३००० चाचण्या केल्या जात असल्यामुळे संक्रमित झालेले नागरिक वेळेत सापडणे शक्य होत नाही. त्यामुळे इतरांना संक्रमणाचा धोका वाढत आहे व वरचे वर रुग्ण संखेत वाढ होण्याची शक्यता आहे.
- अत्यावस्थ झालेल्या रुग्णांचा प्राधान्याने उपचार हा जिल्हा सामान्य रुग्णालय, उस्मानाबाद येथे केला जातो. जिल्ह्यात इतर मोठे खाजगी रुग्णालय किंवा वैद्यकीय महाविद्यालय नसल्याने हा भार जिल्हा सामान्य रुग्णालयावर पडतो.
- निकषानुसार व प्रत्यक्षात काम करतांना लागणारे तज्ञ डॉक्टर व प्रशिक्षित मनुष्यबळ अपुरे असल्याने रुग्ण सेवेवर विपरीत परिणाम होत आहे.
- ·मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांचा विचार केला तर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त २.४०% मृत्युदर आहे व प्रति लाख लोकसंखेमागे ६५ मृत्यू हा ही दुर्दैवी उच्चांकी आकडा आहे. खालील तक्त्याचे अवलोकन केले तर परिस्थितीचे तुलनात्मक गांभीर्य स्पष्ट होत आहे.
औरंगाबाद विभाग - जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्णांचा तक्ता |
||||||
अ. क्र. |
जिल्हा |
लोकसंख्या @2011 प्रमाणे |
एकूण बाधित रुग्ण संख्या |
कोरोना बाधित मृत्यू |
कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू दर |
मृत्यू / लाख लोकसंखेनुसार |
1 |
उस्मानाबाद |
1657576 |
45,431 |
1,077 |
2.40% |
65 |
2 |
औरंगाबाद |
3701282 |
134204 |
2,176 |
1.60% |
59 |
3 |
नांदेड |
3361292 |
86,105 |
1,819 |
2.10% |
54 |
4 |
लातूर |
2454196 |
81,109 |
1,313 |
1.60% |
54 |
5 |
बीड |
2585049 |
67,581 |
1,085 |
1.60% |
42 |
6 |
परभणी |
1836086 |
42,994 |
704 |
1.60% |
38 |
7 |
जालना |
1959046 |
50,673 |
734 |
1.40% |
37 |
8 |
हिंगोली |
1177345 |
15,599 |
227 |
1.50% |
19 |
Report: COVID-19 INDIA as on : 10 May 2021, 08:00 IST @https://www.covid19maharashtragov.in/mh-covid/dashboard |
सार्वजनिक आरोग्य विभागाचे राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या बरोबर गेल्या आठवड्यात सविस्तर चर्चा करून विषयाचे गांभीर्य सांगत उस्मानाबाद जिल्ह्यात तातडीने, जाणीवपूर्वक व नियोजनबद्ध उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित केली होती. राज्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे मंत्री व मराठवाड्याचे सुपुत्र आणि उस्मानाबादचे जावई म्हणून आपण देखील हा विषय अतिशय गांभीर्याने घ्यावा, अशी मागणी आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी केली आहे.