आर्थिक सुधारणेच्या आशेने सोन्यावर दबाव; किमतीत झाली घसरण
Apr 10, 2020, 17:13 IST
मुंबई - यलो मेटलबाबत गुंतवणूकदारांच्या भावनेवरच जगातील आर्थिक सुधारणांच्या आशा अवलंबून असतात. त्यामुळे बुधवारी स्पॉट गोल्डच्या किंमतीत घसरण झाल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे अकृषी कमोडिटीज व चलनचे प्रमुख विश्लेषक श्री प्रथमेश माल्ल्या यांनी सांगितले. बुधवारी सोन्याच्या किंमतीत ०.१६टक्के घट झाली. त्या १६४५.८ डॉलर प्रति औसावर बंद झाल्या. याच वेळी अमेरिका आणि चीन वगळता उर्वरीत आशियात कोव्हिड-१९ च्या रुग्णांची संख्या वाढल्याने बुलियन धातूंच्या किंमतीतील घसरण थांबली. येत्या काही दिवसात जगभरातील विविध सरकारांनी घोषित केलेल्या प्रोत्साहन पॅकेजच्या परिणामांमुळे सोन्याच्या किंमतीही प्रभावित होतील.
बुधवारी स्पॉट सिल्व्हरच्या किंमती ०.१३१ टक्क्यांच्या किरकोळ घसरणीसह १५.० डॉलर प्रति औस या दरावर बंद झाल्या. तर एमसीएक्सवर किंमती ०.८२ टक्क्यांच्या घसरणीसह ४३,१३९ रुपये प्रति किलोग्रामवर बंद झाल्या.
येत्या काही आठवड्यांमध्ये तेलाच्या उत्पादनात कपातीवर ओपेक आणि इतर प्रमुख तेल उत्पादक देशांमध्ये सहमती होण्याच्या आशेने बुधवारी कच्च्या तेलाच्या किंमती ६.१ टक्क्यांनी वाढून२५.१ डॉलर प्रति बॅरलवर बंद झाल्या. ओपेक + च्या बैठकीनंतर क्रूड ऑइलच्या किंमतीत घसरण झाली होती. त्यामुळे पुरवठ्याच्या कपातीचा निर्णय घेण्यास विलंब झाला. तसेच सौदी अरब आणि रशियादरम्यान बाजारातील जास्तीचा वाटा घेण्यावरून स्पर्धा सुरू झाली.