भारतात कोरोना रुग्णाची संख्या २५१, महाराष्ट्रात ५२

 
भारतात कोरोना रुग्णाची संख्या २५१, महाराष्ट्रात ५२
नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच आहे. आतापर्यंत भारतात कोरोनाची 251 प्रकरणे आढळली आहेत. त्यात 32 विदेशी नागरिकांचा समावेश आहे. त्यांच्या संपर्कात येणार्‍या 6700 लोकांवर लक्ष ठेवले जात आहे. कोरोना विषाणूमुळे चार लोकांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत 52, केरळ 40, उत्तर प्रदेश  23, दिल्ली 17, राजस्थान 15, कर्नाटक 15, गुजरात 7, पंजाब 3, ओडिशा 2, चंदीगड 5, पश्चिम बंगाल 2, उत्तराखंडमध्ये 3 रुग्ण आहेत. आंध्र प्रदेश आणि  हरियाणामध्ये  १  तामिळनाडूमध्ये,, जम्मू-काश्मीरमध्ये आणि  तेलंगणामध्ये १, लडाखमध्ये १० आणि मध्य प्रदेशात चार रुग्ण  आढळून आली आहेत.

22 मार्च रोजी रेल्वे गाड्या बंद ठेवल्या जाणार 

सार्वजनिक जनता  कर्फ्यूमुळे 21 मार्चच्या मध्यरात्र ते 22 मार्च रोजी रात्री 10 वाजता सुरू होणारी प्रवासी रेल्वे गाड्या धावणार नाहीत. २२ मार्चच्या जनता कर्फ्यूच्या दिवशी, दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता इत्यादी उपनगरी रेल्वे सेवा खूप कमी धावतील. कमीतकमी गरजा भागवण्यासाठी गाड्या धावतील.

From around the web