आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी दिलेला शब्द पाळला 

ढोकीच्या  गणपत सुरवसे यांच्याकडून कृतज्ञता व्यक्त
 
आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी दिलेला शब्द पाळला

ढोकी - येथील गणपत सुरवसे यांच्या पत्र्याच्या घरात टिप्पर (डंपर)  घुसून दोन ठार आणि पाचजण जखमी झाले होते. जखमी पैकी 5 वर्षीय मुलगा आकाश गणपत सुरवसे याच्या मेंदूस जबर दुखापत झाली होती. त्याच्या उपचाराचा दीड  लाख  खर्च आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी केला. याबद्दल गणपत सुरवसे यांनी आ. राणा जगजितसिंह पाटील यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. 

 ढोकी- लातूर रोडवर पेट्रोल पंप परिसरात राहणाऱ्या गणपत सुरवसे यांच्या पत्र्याच्या घरात 10 नोव्हेंबर टिप्पर (डंपर)  घुसून मोठा अपघात झाला होता.  त्यात त्यांचे आई -  वडील प्रकाश बाबुराव सुरवसे व सौ मद्रिका प्रकाश सुरवसे यांचे जागीच मरण पावले होते तर  5 वर्षीय  मुलगाआकाश गणपत सुरवसे याच्या मेंदूस जबर दुखापत झाली होती. 

या  दुर्घटनेनंतर घटनास्थळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी भेट देवून आवश्यक ती सर्व मदत करण्याची हमी दिली होती. दिलेला शब्द आ. राणा जगजितसिंह पाटील पाळत आकाशचा उपचाराचा खर्च केला. याबद्दल गणपत सुरवसे यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.  

पाहा  व्हिडीओ 

From around the web