जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी घेतली हातात बॅट
लहान मुलांचे क्रिकेट खेळ पाहून जिल्हाधिकाऱ्यांना आवरला नाही मोह
उस्मानाबाद - जिल्हाधिकाऱ्यांचे नेहमी बिझी शेड्युल असते. या कामातून त्यांना वेळ कधीच मिळत नाही. मात्र एका कामासाठी गेल्यानंतर भोसले हायस्कुलवरील मैदानावर लहान मुले बॅट - बॉल घेवून क्रिकेट खेळत असल्याचे पाहून त्यांना लहानपणीचे दिवस आठवले आणि क्रिकेट खेळण्याचा मोह आवरला नाही आणि त्यांनी चक्क हातात बॅट घेवून लहान मुलासोबत काही मिनिटे क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला.
औरंगाबाद पदवीधर मतदार संघाची निवडणूक सध्या सुरू आहे. 1 डिसेंबर रोजी मतदान आहे त्यानिमित्ताने उस्मानाबाद मध्ये विविध उपाययोजना व निवडणुकीच्या उपाययोजनाचा अनुषंगाने नियोजन सुरू आहे. या काळात जिल्हाधिकारी यांनी एका ठिकाणी नियोजित कार्यक्रम संपल्यानंतर बाहेर निघताना भोसले हायस्कुलवरील मैदानावर काही शाळकरी मुलांना क्रिकेट खेळताना पाहिले व जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांना मोह आवरला नाही . त्यांनी थेट त्याठिकाणी जात मुलांना मी ही खेळतो म्हणून बॅट हातात घेतली व काही क्षणांसाठी सोबत असलेले अधिकारी थक्क झाले.
उस्मानाबाद नायब तहसीलदार मुस्तफा खोंदे फेसबुक पर्सनल अकाउंट लिहितात ..
आज ( 11 नोव्हेंबर ) जिल्हाधिकारी महोदय कामाच्या व्यापातून वेळ काढून पदवीधर मतदान केंद्र तपासणीसाठी निघाले , मतदान केंद्राची पाहणी करून परतत असताना काही शाळकरी मुले शाळेच्या प्रांगणात क्रिकेट खेळत असताना दिसली आणि जिल्हाधिकारी महोदय यांना त्यांच्यासोबत क्रिकेट खेळण्याचा मोह आवरला नाही ! यानिमित्ताने या घटनेचे साक्षीदार होता आले ..
व्हिडीओ पाहा