येडशीच्या रामलिंग देवस्थान परिसरामध्ये स्वच्छता मोहीम

उस्मानाबाद - सोशल मीडियाचा काही जण दुरुपयोग करीत असले तरी उस्मानाबादेत सोशल मीडियाच्या माध्यमातून स्थापन झालेल्या उस्मानाबादेतील एका समूहाने रामलिंग पर्यटन स्थळाची स्वछता मोहीम राबवून सामाजिक बांधिलकी जपासली आहे.
जिल्ह्यात कोविड -19 च्या संकटात नागरिकांच्या मदतीसाठी सुरू झालेल्या MH 25 Helping Hands या समूहाच्या वतीने प्रथम लाटेमध्ये व दुसरा लाटे मध्ये नागरिकांना लागणाऱ्या आरोग्य विषयक विविध मदती सोबतच विविध अडचणी सोडविण्याचे काम केले होते. आता MH 25 Helping Hands हा व्हाट्सअप समूह आता एका सामाजिक संस्थेच्या रुपात समोर येत आहे.
२ जानेवारी रोजी समुहाच्या वतीने येडशी येथील रामलिंग देवस्थान परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली या स्वच्छता मोहिमेमध्ये जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला तसेच प्रशासनाने देखील मोठ्या प्रमाणात सहकार्य केले
समुहाच्या वतीने रामलिंग मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवून मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला. काही ठिकाणी दगडावर लिहिलेले नावे पुसून काढण्यात आली , पर्यटन स्थळ स्वच्छ ठेवावे झाडे जगवा झाडे वाचवा यासह अभयारण्य सुरक्षित ठेवण्यासाठी विवीध सुविचारांचा पाट्या याठिकाणी लावण्यात आल्या आहेत , मंदिर परिसरामध्ये असणाऱ्या व्यवसायिकांना देखील स्वच्छता राखण्यासाठी मदतिचे आवाहन संस्थेच्या वतिने करण्यात आले आहे या पुढील काळात रामलिंग अभयारण्यातुन वाहनारे ओढे साफ करुन पर्यटनच्या दृष्टीने विवीध उपक्रम राबवनार असल्याचा मानस संस्थेच्या वतिने व्यक्त करण्यात आला.
मोहिम यशस्वी करण्यासाठी युवा आधार प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर,डाॅ प्रतापसिंह पाटील,प्रा तुषार वाघमारे,श्यामराव गोरे,डाॅ प्रशांत पवार,चंद्रकांत महाजन येडशी ग्रामपंचायत,येडशी ग्रामीण रुग्णालय आदींचे सहकार्य लाभले.
विशेष बाब वाघोली येथिल नवदामंपत्य हनुमंत काळे हे सपत्निक स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. समूहाच्या वतीने सहभागी सदस्यांना टी-शर्ट व स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदविल्या बद्दल आभार पत्र देऊन गौरव करुन मोहिमेची सांगता करण्यात आली. यापुढील काळात रामलिंग अभयारण्यात विवीध उपक्रम राबवनार रामलिंग अभयारण्यातुन तिन ते चार छोटे ओढे वाहतात पण ते अनेक वर्षापासुन दुर्लक्षित झाले असल्याने त्यात दगडांचा खच व प्लास्टिक मोठ्या प्रमाणात आहे. पुढील काळात ओढे साफ करुन त्यांना गत वैभव प्राप्त करुन देण्यासाठी टिम प्रयत्नशील असणार आहे अशी माहिती समूहाच्या वतीने देण्यात आली आहे.