डोरेमोन आणि शिनचैन कार्टून पाहणारी मुले दूरदर्शनवर 'रामायण' पाहू लागली...

 
डोरेमोन आणि शिनचैन कार्टून पाहणारी मुले  दूरदर्शनवर 'रामायण'  पाहू लागली...


कोरोना विषाणूमुळे देशभरात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला  आहे. त्यानंतर पुन्हा रामायण, महाभारत मालिका सुरु करावी, अशी मागणी होऊ लागली. त्याची दखल घेत दूरदर्शनने रामायण मालिका सुरु केली आहे. अबालवृद्धाबरोबर डोरेमोन आणि शिनचैन कार्टून पाहणारी मुले  दूरदर्शनवर 'रामायण'  पाहू लागली आहेत.


पूर्वी टीव्हीवर फक्त दूरदर्शन हे ऐकमेव चॅनल दिसत  होते. त्यावेळी  रामानंद सागर यांची  दूरदर्शनवर  २५  जानेवारी  १९८७  ते 31 जुलै १९८८  दरम्यान रामायण मालिका सुरु होती, तेव्हा  लोक ही मालिका पाहण्यासाठी टीव्हीसमोर गर्दी करायचे. त्यावेळी  एक प्रकारचा लॉकडाउन असायचा. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेगळा प्रकारच लॉकडाऊन सुरु आहे आणि रामायण मालिकेचे पुर्नप्रसारण सुरु आहे.ज्यांनी पूर्वी रामायण मालिका पाहिली होती, ते पुन्हा त्याच आवडीने मालिका पाहात आहेत. त्यांच्यासोबत घरातील लहान मुलेही आवडीने रामायण मालिका पाहू लागले आहेत.

तथापि, अशी काही मुले आहेत ज्यांच्यासाठी हे प्रथमच आहे. डोरेमोन आणि शिनचैन कार्टूनसारखे  अ‍ॅनिमेटेड शो पाहून वाढलेल्या पिढीसाठी ही मालिका एक रोचक बाब आहे. आजी आणि आजीच्या हरवलेल्या कथांमधील राम आणि अर्जुनसारख्या योद्ध्याबद्दल त्याला जाणून घेणे खूप मनोरंजक आहे. तो भारतीय संस्कृतीचे अविभाज्य भाग असलेले देव समजून घेत आहे.

From around the web