कोरोना होऊ नये काही म्हणून घरगुती उपाय ... 

 
कोरोना होऊ नये काही म्हणून घरगुती उपाय ... 


       उस्मानाबाद - आयुष मंत्रालय द्वारे कोविड 19 संकट समयी स्व देखभाल आणि रोग प्रतिबंधक क्षमता वाढवण्यासाठी आयुर्वेदिक उपाय:

कोविड-19 या वैश्विक महामारी द्वारे सर्व मानव जात पीडित/ग्रस्त आहेत. अशा प्रसंगी स्वास्थ टिकविण्या करिता  रोंगप्रतिबंधक उपाय महत्वाचे ठरतात या महामारी करिता स्व बचाव प्रणाली अतिशय महत्वाची आहे. आज प्रर्यत या रोगावर कोणतेही औषध तयार करण्यात आलेले नाही. या रोगापासून स्वतःला वाचाविण्यासाठी आपल्या शरीराची रोग प्रतिबंधक शक्ती वाढविणे उत्तम ठरू शकते. या करिता आयुर्वेदिक उपाय दिनचर्या आणि ऋतुचर्या यावर आधारित आहे. या द्वारे आपली रोग प्रतिबंधक क्षमता वाढवता येते.

आयुष मंत्रालय श्वसन तंत्र आरोग्य संबंधी “स्वयं देखभाली च्या काही दिशा निर्देश खालील प्रमाणे देत आहे

अ.   सामान्य उपाय

1.     संपूर्ण दिवस गरम पाणी प्यावे.

2.    दररोज किमान 30 मिनिट योगासन, प्राणायाम आणि ध्यान करावे.

3.    हळद, जिरे, धने आणि लसूण इ. मसाले पदार्थचा प्रयोग जेवणात करावा.


आ.रोग प्रतिबंधक क्षमता वाढविण्या करिता आयुर्वेदिक उपाय.

1.     चवनप्राश(1 चमचा ) सकाळी घ्यावे.

2.    मधूमेहाच्या रुग्णांनी साखर विरहित चवनप्राश घ्यावे.

3.    तुळशीची पाने, दालचिनी, काळी, मिरी सुंठआणि मनुक्या पासून तयार केलेला काढा दिवसातून एकदा किंवा दोनदा घ्यावा. चवी नुसार यात गूळ किंवा ताजा लिंबू रस मिसळावा.

4.   गोल्डनमिल्क-150 मी.ली गरम दूध मध्ये हळद घालून दिवसातून एकदा किंवा दोनदा घ्यावे.इ.      सामान्य आयुर्वेदिक उपाय.

1.     सकाळ संध्याकाळ तीळ/खोबरेल तेल किंवा तूप दोन्ही नाकपुढीत लावावे.

2.    1 चमचा तीळ/खोबरेल तेल तोंडात घेऊन चूळ भरावी नंतर ते थुंकावे नंतर गरम पाण्याने गुळण्या करावेअसे एकदा किंवा दोनदाकरावे.


ई.      खोकला/घश्यात खवंखवं होत असेल तर

1.     दिवसातून किमान एकदा पुदिनाची पाने किंवा ओवा घालून गरम पाण्याची वाफ घ्यावी.

2.    खोकला किंवा घश्यात खवंखवं होत असेल तर लवंग चूर्ण, गूळ किंवा मधामध्ये मिसळून दिवसातून दोन तीन वेळेस घ्यावे.

  हे उपाय सामान्य कोरडा खोकला/ घश्यात खवंखवं असल्यास लाभदायक आहे लाभ होत नसेल तर डॉक्टरचा सल्ला घ्यावा.  असे आवाहन  जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी केले आहे.

From around the web